Download App

Uddhav Thackeray: “मी तसं पुत्रप्रेम दाखवलं नाही” उद्धव ठाकरेंचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray On Amit Shah:  राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची सुरुवात झाली आहे.  प्रचाराच्या रणधुमाळीमुळे राज्यात राजकीय वातावरण देखील चांगेलच तापले असून महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भंडाऱ्यातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना पक्ष फुटला असे वक्तव्य केले होते तर आता त्यांच्या या टीकेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिला आहे. मुबईमधील आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारतीय क्रिकेट संघ (Team India) विश्वचषक स्पर्धेत (World Cup) अंतिम सामना हारला, असा टोला अमित शाह यांना उद्धव ठाकरे यांनी लावला.

भंडाऱ्यातील प्रचार सभेत अमित शाह यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हणाले होते की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपवर आम्ही त्यांचे पक्ष फोडले असे आरोप करतात मात्र भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फोडले नाही, उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे आणि शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटले.

आज मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांना या विषयावर प्रश्न करण्यात आला होता. यावर उत्तर देताना अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला आहे. मी तसं पुत्रप्रेम दाखवलं नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

तर फडणवीसांना टोला लावत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे अमित शाह यांचा चेला म्हणून संबोधले. फडणवीस यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपमध्ये आज अमित शाह यांचा पद काय आहे हे माहिती नाही, भाजपमध्ये त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना किती अधिकार असतात हे संपूर्ण देशाला माहिती आहे. अमित शाह जे बोलतात त्यामध्ये आणि त्यांच्या चेलेचपाट्यांच्या वक्तव्यामध्ये एकवाक्यता ठेवली पाहिजे. शाह म्हणतात की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही फोडली नाही मात्र फडणवीस बोलतात की, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. यामुळे अमित शाह यांची लाज त्यांचे चेलेचपाटे काढत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

follow us