Download App

जरा या म्हटल्यावर शेपूट हलवत जातात, राज ठाकरे-अमित शाह भेटीवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मनसे एनडीत सहभागी होणार, त्यांना महायुतीच्या माध्यमातून दोन जागा सोडल्या जातील, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला.

नाट्य परिषदेच्या नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न; मुंबईत होणार अंतिम सोहळा 

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सिंदखेडयेथे जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, माझं मुख्यमंत्रीपद खेचलं म्हणून मी लढत नाही. महाराष्ट्र ओरबडला जातोय आणि कोणाला काहीच पडलेलं नाही. ना मिंधे ना काही पडलंय, ना अजित पवारांना काही पडलं आहे. आमचे सगेसोयरे, जरा या म्हटलं की, शेपूट हलवत जातात, अरे शरम वाटली पाहिजे, माझा महाराष्ट्र लुटला जातोय, आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी लोटांगण घालताय, अशी बोचरी टीका केली. मी माझ्या आयुष्यात असं काही करू शकत नाही, असंही ठाकरे म्हणाले.

‘अमरावतीच्या जागेवर भाजकपकडून नवनीत राणा…; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान… 

ठाकरे म्हणाले, माझ्या मनात गुजरातबद्दल द्वेष नाही आणि गुजराती बांधवांशी वैर नाही. तुम्ही इथे शतकानुशतके राहत आहात. तुम्हीही मोदींना सांगा की तुम्ही गुजरात आणि संपूर्ण देशात भींत उभी करत आहात… महाराष्ट्रात येऊ शकणारे उद्योगधंदे मोदीजा गुजरातला नेत आहेत. काल परवा देशात सेमीकंडक्टरचे तीन अद्योग त्यातले दोन उद्योग गुजरातला गेले. महाराष्ट्राने काय घोडं मारलं, मोदीजी, तुम्ही उद्या पंतप्रधान होणार नाहीच, पण विनाकारण राज्यांमध्ये आगी लावत आहात, असंही ठाकरे म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले, इथला गद्दार, त्याला तर आपण काय करायचं… किती वेळा आपण त्याला खासदार करायचं? एक म्हण आहे, खाल्या मिठाला जागत नाही, तसा तो दिल्या मताला जागत नाही. तो गद्दार आहे. मी काय नाही दिला तुला… आधी तुला आमदार केलं, मग खासदार केलं… प्रत्येकवेळी निवडणुक आली की हेच बुजगावणं उभं. बुलढाणा हा काही तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलेला नाही. आता या गद्दाराला पाडल्याशिवाय राहू नका, असं आवाहनही ठाकरेंनी केलं.

follow us

वेब स्टोरीज