Download App

आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं अन् तुमचं घरं पेटवणारं; उद्धव ठाकरेंनी भाजपचं हिंदुत्वच काढलं

Udhav Thackeray On BJP : आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं अन् तुमचं घरं पेटवणारं असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भाजपचं हिंदुत्वचं काढलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगडमधील रोहामध्ये आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘शिवसन्मान पुरस्कार’ जाहीर; साताऱ्यात शिवजयंतीला होणार वितरण

उद्धव ठाकरे म्हणाले, आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं अन् भाजपचं हिंदुत्व घरं पेटवणारं आहे. आम्हाला घरं पेटवायची नाहीत यांचं जे राजकारण चाललं आहे ते आम्हीच चूलीत घालणार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे. तसेच आम्हाला घरातल्या चुली पेटवायच्या आहेत, जाती-जातीत तेढ, धार्मिक तेढ करुन राजकीय पोळी आम्हाला भाजायची नाही. देशातली सर्व शासकीय यंत्रणा हे लोकं घरगडीसारखी वापरतात. देशात हुकूमशाही नकोयं म्हणून मुस्लिम बांधवही आमच्यासोबत आहेत. नको ते पुन्हा निवडून आले तर देश प्रजासत्ताक राहणार नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रभासनंतर आता रणबीर साकारणार श्रीराम! सीतेच्या भूमिकेत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री

शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. देशातील गरीब, महिला, तरुण, शेतकरी या जातीसाठी काम करणार असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत, हे धाडस त्यांनी केलं त्यांचे अभिनंदन करत आहे. तुमच्या पंतप्रधानांच्या मित्रापलीकडेही देश आहेत हे आता 10 वर्षानंतर त्यांना कळले आहे. महिलांबद्दल तुम्ही बोलताय मग सीतारामन जी तुम्ही मणिपूरकडे का जात नाहीत? बिलकीस बानूकडे जा? सांगा आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही ते म्हणाले आहेत.

दारु घोटाळा प्रकरण : दिल्लीचे CM अरविंद केजरीवालांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स

हिंमत असेल तर चीनला ईडी पाठवा…
1992 साली बाबरीचं प्रकरण घडलं. त्यानंतर भाजपने नेहमीच राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला. मधल्या काळात अटलजींचं सरकार आलं पण मंदिर बांधून झालं नाही. त्यावेळी आम्हीही त्यांना पाठिंबा दिला होता. नंतर आता मोदी आले म्हणजे चांगला शेर आलायं वाटलं, मोदी सरकार पाकिस्तानला त्याच्या भाषेत उत्तर देईल असं वाटलं पण भारतात चीन घुसतोयं त्याच्याकडे बघण्याची हिंमत नाही. हिंमत असेल तर तुम्ही चीनकडे ईडी पाठवा ना, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

follow us