Download App

‘एकनाथ शिंदे खुर्चीसाठी शेपूट हलवतोयं’; एकेरी उल्लेख करीत ठाकरेंची जळजळीत टीका

Udhav Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) खुर्चीसाठी शेपूट हलवत असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. नाशिकमध्ये ठाकरेंनी आयोजित सभेतून पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोडच उठवली आहे.

शेअर बाजारात हाहाकार! मंगळवार ठरला अमंगल; सेन्सेक्स 1053 तर, निफ्टी 333 अंकांनी आपटला

उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात काही कडवी पाने आहेत, मोदींचं राजकारण घाणेरडं आहे. ते देश आणि गुजरातमध्ये एक भींत उभी करतात हे आम्हाला मान्य नाही. शिवरायांनी सुरत लुटली तेव्हा गुजरातची होती म्हणून नव्हती लुटली ती इंग्रजांची वखार होती म्हणून लुटली होती. तुम्ही आमचा महाराष्ट्र लुटता आहात मिंध्या तुझ्यासमोर महाराष्ट्र ओरबाडला जातोयं अन् तू खुर्चीसाठी शेपूट हलवतोस हेच बाळासाहेबांचं हिंदुत्व का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना केला आहे.

IND vs ENG : विराटच्या जागी कोण? ‘या’ दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा; BCCI लवकरच करणार घोषणा

तसेच भाजपमध्ये आजही ती व्यक्ती आहे. 2014 साली युती तोडली तेव्हा जनतेच्या जीवावर 15 दिवसांत शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले होते. तेव्हा युती तुटलेली होती हेच दाढीवाले बुवा होते. भाजपची ती व्यक्ती तुमचं अभिनंदन. दिल्लीत चर्चा आहे की बाळासाहेब तर नाही राहिले उद्धव ठाकरे काही करु शकत नाही आता शिवसेनेला संपवा अशी वेळ आली आहे. त्यांची 5 ते 10 जागा येतील पण तुमची 63 आमदार आले आहेत. तुम्हाला दिल्ली घाबरते तेव्हाही शिवसेना संपवायची भाषा करत होते, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.

राम वाद नव्हे तर, समाधान! फक्त विचार बदलण्याची गरज; प्राणप्रतिष्ठापना होताच मोदींनी टोचले विरोधकांचे कान

2014 साली अमित शाहांनी दिलेलं वचन मोडलं नाही पाळलं. तरीही ते रामभक्त असल्याचं म्हणत आहेत. वचन मांडल असतं तर आज देवेंद्र फडणवीस हे पाव मुख्यमंत्री नाहीतर पूर्ण मुख्यमंत्री झाले असते. तुम्ही फोडाफोडी केली नसती तर शिवसेनेची ताकद तुमच्यासोबत असते. पुन्हा दिल्लीत पाठवलं असतं
पण तुम्ही पक्ष पळवता, घर फोडता, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

follow us