IND vs ENG : विराटच्या जागी कोण? ‘या’ दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा; BCCI लवकरच करणार घोषणा
IND vs ENG : Virat Kohli : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आता विराटच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याची घोषणा बीसीसीआयकडून लवकरच होईल. मात्र त्याआधीच या जागेसाठी दोन खेळाडूत जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे.
विराट कोहली संघात चौथ्या क्रमांकावर खेळतो. आता विराट नाही म्हटल्यानंतर त्याच्या जागी केएल राहुल हाच एक पर्याय आहे. त्यानंतर सहाव्या जागेसाठी कोण असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा परिस्थितीत ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) आणि केएस भरत (KS Bharat) या दोघांची नावे पुढे आली आहेत.
Ind vs Ban: विराट कोहलीने सचिन तेंडुलकराचा आणखी एक विक्रम मोडला !
टी 20 क्रिकेट लीगमधील राजस्थानच्या संघातील खेळाडू ध्रुव जुरेल याची भारतीय संघाच प्रथमच निवड झाली आहे. त्यामुळे आता त्याला पदार्पणाची संधी मिळते का हे पहावे लागणार आहे. कारण पहिल्या दोन कसोटींसाठी त्याची निवड झाली आहे. आता फक्त अंतिम अकरा खेळाडूत निवड होणे बाकी आहे. त्यानंतर केएस भरत याचीही दावेदारी मजबूत मानली जात आहे. भारत अ आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या सामन्यांचा विचार केला तर केएस भरतने शतक झळकावले आहे. त्यामुळे त्याची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या गैरहजेरीमुळे दोघांतील एकाला संधी मिळू शकते.
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! PCB अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा
भारताचा संभाव्य संघ
इंग्लंड कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, केएस भरत/ध्रुव जुरेल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, सिराज, मुकेश कुमार, जसप्रित बुमराह या खेळाडूंचा संघात समावेश असू शकतो.
दरम्यान, बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, विराट कोहलीने बीसीसीआयला वैयक्तिक कारणांसाठी इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेण्याची विनंती केली होती. आता त्याची विनंती मान्य करण्यात आली आहे. बीसीसीआय (BCCI) लवकरच त्याच्या रिप्लेस खेळाडूची घोषणा करेल.
कोहलीने इंग्लंडविरुद्ध 42.36 च्या सरासरीने 1991 कसोटी धावा केल्या आहेत. तो शेवटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेत खेळला होता. वैयक्तिक कारणांमुळे इंग्लडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात तो खेळू शकणार नाही.