Ind vs Ban: विराट कोहलीने सचिन तेंडुलकराचा आणखी एक विक्रम मोडला !
Virat Kohli : पुण्यात झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत केले आहे. याचबरोबर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताने सलग विजयाचा चौकार मारला आहे. बांगलादेशने दिलेले २५७ धावांचे लक्ष्य भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा करत पूर्ण केले. विराट कोहलीने विजयी षटकार मारला. याचबरोबर त्याचे वनडेतील 48 वे शतकही पूर्ण केले आहे. याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 हजार धावांचा मोठा पल्ला पार करत एक विक्रम नोंदविला आहे. तर क्रिकेटचे देव सचिन तेंडूलकराचा एक जागतिक विक्रमही त्याने मोडला आहे. ( Virat Kohli has become the fastest player to complete 26,000 runs in international cricket )
World Cup 2023 : भारताचा बांगलादेशवर ‘विराट’ विजय; कोहलीने वनडेमधील 48 वे शतक ठोकले
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकर व्यतिरिक्त दोन खेळाडूंनी 26 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. रनमशीन विराट कोहली आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 511 सामने खेळला आहे. त्यात 567 डाव्यात त्याने 106 च्या स्ट्राइक रेटने 26 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर सचिन तेंडूलकरने 26 हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी 601 डाव खेळला आहे. परंतु क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा सचिनने केल्या आहेत.
World Cup : बांग्लादेशला पराभूत करताच भारताची सेमी-फायनलमध्ये एन्ट्री? काय आहेत समीकरणं?
त्याने सर्व प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये 664 सामने खेळत 34 हजार 34, 357 धावा केल्या आहेत. त्याच्याजवळही सध्याचा तरी कोणताही खेळाडू नाही. सचिन तेंडूलकरनंतर श्रीलंकेचा कुमार संगकारा, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंगने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. तर पाचव्या क्रमांकावर महेला जयवर्धने आहे. विराट कोहली वगळता बाकी सर्व जण निवृत्त झालेले आहेत. विराट कोहलीचे वय पाहता तो सचिन तेंडूलकरच्या विक्रमाबरोबर जाईल, असे बोलले जात आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
1) सचिन तेंडुलकर-सामने-664, धावा-34,357
2) कुमार संगकारा- सामने 594, धावा-28,016
3) रिकी पाॅटिंग- सामने 560, धावा-27,483
4) विराट कोहली- सामने 511, धावा-26000*
5) महेला जयवर्धन-सामने 652, धावा-25,957