उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था सहन होईना अन् सांगताही येईना अशी झाली असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच भर सभेत फडणवीसांचं राष्ट्रवादीशी युती करणार नसल्याच्या विधानाची ऑडिओ क्लिप ऐकवत त्यांनी खिल्लीही उडवली आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘कलंक’ असा केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. उद्धव ठाकरे नागपुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत भाजपला धारेवर धरलं आहे.
राजू शेट्टींच्या मुलाची वरात ट्रॅक्टरवरून विवाहस्थळी दाखल, पाहा फोटो
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी “मी अविवाहित राहणं पसंत करेन पण मी राष्ट्रवादीशी युती करणार नाही नाही नाही’ असं स्पष्टीकरण दिलं होतं. ती क्लिपच उद्धव ठाकरे यांनी भर सभेत ऐकून दाखवली आहे. आता भाजपने सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा सामावून घेतला आहे. मी पुन्हा येईन असं ते म्हणाले होते, पण दोघांना घेऊन आले आहेत. एवढं करुन ते म्हणताहेत की ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला, वार करणारी तुमची औलाद आहे आमची नाही, असं म्हणत ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘अजितदादांना व्हिलन करुन भाजप एसीमध्ये मजा पाहतोय’; रोहित पवारांचा हल्लाबोल
तसेच 2014 ते 2019 आम्ही भाजपसोबतच सत्तेत होतो, त्यावेळीही आम्हाला कॉंग्रेसकडून ऑफर होती, पण आम्ही ऑफरचा स्विकार केला नाही, कारण शिवसेना जे काही करेल ते खुलेआमपणे करत असते. 2019 ला शिवसेनेनी युती तोडली नव्हती, वार करणारी तुमची औलाद आहे आमची नाही, आमचं हिंदुत्व देवळातलं घंटा बडवणारं नाही, हिंदुत्वाच्या पायावर कुऱ्हाड पहिल्यांदा भाजपने मारली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
मेळाव्यात कार्यकर्त्यांचा गोंधळ :
नागपुरात पदाधिकाऱ्यांचा मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करण्यासाठी येताच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती. बराचवेळ घोषणा सुरुच होती, अखेर घोषणा थांबवण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर घोषणा थांबल्या होत्या. त्यानंतर सभागृहाच्या मध्यभागी काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं दिसून आलं त्यामुळे काही काळ मेळाव्यात गोंधळ निर्माण झाला होता. अखेर उद्धव ठाकरेंनी या कार्यकर्त्यांना बाहेर जा, अशी तंबी दिल्यानंतर ते बाहरे गेल्याचं दिसून आले.
सध्या देवेंद्र फडणवीसांची हालत अशी झालीय सहन होईना अन् सांगता येईना, त्यांना काहीतरी झालंय पण सांगण्यासारख नाही, या शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा जहाल भाषेत समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या मुंबईतील कार्यक्रमावर आक्षेप घेत टीका केलीय. मुंबईतील खारघरमध्ये सत्तेच्या लोभासाठी धर्माचा आधार घेत 15 जणांचा बळी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्यासारखा मी क्रूर नाही त्यामुळेच मधल्या काळात आम्ही वज्रमूठ सभा थांबवल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.