Download App

‘दौरा मनोरंजन वाटतं’ म्हणणाऱ्या विखेंवर ठाकरेंची टीका! म्हणाले, दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य

udhav Thackeray Vs Radhakrushna Vikhe : अहमदनगर दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Devendra Fadanvis : फडणवीसांची आमदारकी वाचली; ‘त्या’ दोन खटल्यातून निर्दोष सुटका

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहेत. अहमदनगरमध्येही हीच परिस्थिती दिसून येत असून अहमदनगर दुष्काळसदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य असल्याची परिस्थिती असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Airhostess रुपलची हत्या करणाऱ्या संशयिताची तुरुंगातच आत्महत्या; पॅन्टच्या सहाय्याने गळफास

निर्बुद्ध पद्धतीने वागू नका :
धनगर समाजातील तरुणांनी आज राधाकृष्ण विखे यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे, आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने आपला संयम सोडू नये, जर सरकार असंच निर्बृद्ध पद्धतीने वागत असेल तर ते काय कुवतीचं सरकार आहे हे जनतेला त्यांच्या भाषेतून कळत असल्याचं ते म्हणाले आहेत.

Maratha Reservation : कुणबी दाखला मिळणार! गठीत केलेल्या समितीची कार्यपद्धती कशी असणार?

काय म्हणाले होते विखे? :
उद्धव ठाकरेंचा बांधावर जाण्याचा हा फार्स आहे. त्यांना ही गोष्ट मनोरंजन वाटते. यापूर्वी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ‘५० हजार रुपये एकरी मदत केली पाहिजे, त्यासाठी मी स्वस्थ बसणार नाही’ असं ते म्हणाले होते. त्याचं काय झालं? २०१४ ते १९ त्यांचं सरकार होतं. तेव्हा काय केलं तुम्ही? तेव्हा तुम्हाला शेतकरी दिसला नाही का? असा सवाल विखे यांनी उद्धव ठाकरेंना केला होता.

पावसामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे, दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नूकसान झालं आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नूकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. नूकसानीचे पंचनामे कधी होतील? ही भरपाई कधी मिळेलय़ एक रुपयांत पीकविम्याचं धोटांड सरकारने मांडलं असून अस्मानी नाहीतर सरकारची सुलतानी शेतकऱ्यांवर पडत आहे, शेतकऱ्यांवर संकटात असून ना पालकमंत्री ना कृषीमंत्री फिरत आहेत, सरकारने भटकण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे, सत्ताधाऱ्यांकडे पक्ष फोडायला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना द्यायला नसल्याचाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Tags

follow us