Download App

घटना अवैध तर मग आमदार अपात्र कसे? उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांना खडा सवाल

Udhav Thackeray : शिवसेना पक्षाची घटना अवैध असेल तर मग आमदार अपात्र कसे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray)यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदार प्रकरणावर(Disqualification Mla) निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये नार्वेकरांनी उद्धव ठाकरे गटाची घटना अमान्य केली असून अवैध ठरवली आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत नार्वेकांवर विविध मुद्द्यांवरुन टीका केली आहे.

Disqualification Mla : विधानसभा अध्यक्षांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंगच; निकालावर राऊतांचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरे म्हणाले, राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी केलं नाही, दुसरीकडेच ते गेले आहेत. त्यांनी या प्रकरणी वेळकाढूपणा केला आहे. हा निकाल ते पहिल्या दिवशीही देऊ शकत होते. निवडणुकीआधी दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. हा निकाल आम्हाला आणि जनतेला मान्य नाही. जर घटना अवैध तर मग आमदार अपात्र कसे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

तसेच शिवसेना संपवायचा यांचा डाव आहे पण संपणार नाही. मिंध्यांची शिवसेना राज्यातील जनता मानणार नाही. आमची घटना अवैध तर आमचे आमदार पात्र कसे/
शिंदेंची शिवसेना ही कधीच होऊ शकत नाही कारण शिंद आणि शिवसेना हे नातच तुटलेलं आहे. न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली तेव्हाच हे सगळं ठरलं होतं. हा निकाल सर्वोच्च नाही न्यायालयात टिकणार नाही. 12 तारखेला मोदी येतात यावरुनच निकाल कळला असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

नुसता जाळ नी धूर! रोहित शेट्टीने शेअर केला सिद्धार्थचा ‘इंडियन पोलिस फोर्स’चा दमदार लूक

उबाठा म्हणू नका…
शिवसेना पक्षाचे प्रमुख एकच आहेत. मी पक्षप्रमुख आहे. याबाबत शिवसेना पक्षाच्या घटनेत नमूद करण्यात आलं आहे. आधीही आम्ही घटना दिलीयं, आत्ताही 2018 ची घटना दिली आहे. उबाठा म्हणू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा… मी या अन्याविरोधात उभा ठाकलो असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, हा अंतिम निकाल नाही. आम्हाला हा निकाल अमान्य असून जनतेलाही मान्य नाही. आम्ही सर्वोच्च न्यायलयात जाणार असून घटना दिली तेव्हा त्यात शिवसेना प्रमुख हे एकच आहेत मी पक्षप्रमुख आहे आधीची घटना दिली 2018 चीही घटना दिलीयं. त्यामुळे जर आमची घटना अवैध असेल तर आमदार अपात्र कसे? अशा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

follow us