Download App

‘सिंचन घोटाळ्याचे पुरावे पंतप्रधान मोदींकडे मागा’; उद्धव ठाकरेंनी अजितदादांनाही सोडलं नाही

सिंचन घोटाळ्याचे पुरावे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागा, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांना चांगलचं खडसावलं आहे. जालन्याच्या लाठीचार्ज घटनेवर बोलताना अजित पवारांनी लाठीचार्जचे आदेश सरकारने दिल्याचा पुरावे द्या, असं खुलं आव्हान विरोधकांना दिलं होतं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी अजितदादांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Avadhoot Gupteने केली ‘लावण्यवती’ या नवीन कलाकृतीची घोषणा; चाहते म्हणाले, “दादाचा…”

उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारने लाठीचार्जचा आदेश दिल्याचा जसा पुरावा मागतायं तसाच पुरावा तुमच्याबद्दल भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांनी केला होता त्यांच्याकडे मागा, ज्यांनी तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांनीच आता तुम्हाला उपमुख्यमंत्री केल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलेआमपणे अजित पवार यांच्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याबद्दल भाष्य केलं होतं. त्यानंतर आता अजितदादा तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेही असेच पुरावे मागा, असा टोलाच उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना लगावला आहे.

Horoscope Today: ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!

तसेच मी मुख्यमंत्री असतानाही राज्यात अनेक आंदोलने, मोर्चे निघाले होते, त्यावेळी माझ्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी चर्चा करुन त्यातून मार्ग काढला आहे, त्यावेळी अजित पवारही सोबत होते, त्यांना माहित आहेच ना. अजितदादांसोबतच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचं ज्ञान तोकडं आहे, वटहुकूम काढण्याचा अधिकार संसदेला आहे, तसं असतं तर मग दिल्ली सरकारने वटहुकूम फिरवला का नाही? दिल्ली विधेयकाबाबत केंद्र सरकारने वटहुकूम फिरवला, तो अधिकार केंद्र सरकारचा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Road Accident : भीषण अपघात! उड्डाणपुलावरून खाली पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

तसेच फडणवीसांचं तोकडं ज्ञान पाहुन ते आता मंत्रालयाच्या आजूबाजुलाही फिरण्याच्या कुवतीचे नसून देवेंद्र फडणवीस यांनी कधीही अभ्यास केला नाही, आता ते म्हणतात ना की आरक्षण रद्द झाल्यानंतर मी वटहुकूम काढला नाही, ठीक आहे माझी चूक झाली आता तुम्ही वटहुकूम काढून दाखवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

लाठीचार्जचा आदेश आम्ही दिला नाही असं सरकारकडून सांगण्यात आलंय, याचा अर्थ राज्य सरकारचा गृह खात्यावर कंट्रोल नाही, त्यांचा प्रशासनावर काहीच वचक राहिलेला नाही, मी मुख्यमंत्री असताना कुठेही लाठीमार झाला नाही बारसू प्रकरणी तुम्ही माफी मागितली का? तुमच्या अंगलट आल्याने तुम्ही माफी मागत असल्याचीही टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Tags

follow us