Road Accident : भीषण अपघात! उड्डाणपुलावरून खाली पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Road Accident : भीषण अपघात! उड्डाणपुलावरून खाली पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Road Accident : नगर शहराच्या वैभवात भर घालणारा उड्डाणपूल सध्या वाहनचालकांसाठी काळच (Road Accident) ठरू लागला आहे. आज या उड्डाणपुलावरून खाली पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही दु्र्दैवी घटना रविवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक चौक ते चांदणी चौक या परिसरात घडली. या अपघातात एका व्यक्तीचा उड्डाणपुलावरून पडून मृत्यू झाला आहे. दरम्यान याआधी देखील पुलावरून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली; दोन जणांचा मृत्यू; 5 जण जखमी

याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास (Road Accident) नगर शहरातील स्टेट बँक चौक ते चांदणी चौक या उड्डाणपुलावरील मार्गावरून पती-पत्नी हे त्यांच्या दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे जात होते. त्यांच्या वाहनाचा वेग खूप असल्यामुळे त्यांना ते वाहन नियंत्रित करता आले नाही. उड्डाणपुलाच्या वळणावर वाहन कठड्याला घसरून दुचाकी चालक पुलावरून खाली पडला तर त्याची पत्नी जखमी झाली. तिला एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती समजताच स्थानिक रहिवाशांसह प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या अपघातात (Road Accident) अत्यवस्थ झालेला दुचाकीचालक जागेवरच गतप्राण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या मयत दुचाकी चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान उड्डाणपुलावर याआधी देखील अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वाहनधारक अत्यंत वेगाने वाहन चालवत असल्याचे यापूर्वी देखील निदर्शनास आले आहे. मात्र हाच वेग आता त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Milk Adulteration : दूध भेसळ रडारवर! नगर जिल्ह्यात तपासणी मोहिम

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube