Milk Adulteration : दूध भेसळ रडारवर! नगर जिल्ह्यात तपासणी मोहिम

Milk Adulteration : दूध भेसळ रडारवर! नगर जिल्ह्यात तपासणी मोहिम

Milk Adulteration : राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा (Milk Adulteration) होण्याच्या अनुषंगाने दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी आता शासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील दुधातील भेसळ रोखण्यासाठी जिल्ह्यात 15 सप्टेंबरपर्यंत धडक तपासणी मोहिम राबवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी अन्न औषध विभागाचे सहायक आयुक्त यांना दिले आहेत. जर भेसळखोरी आढळली तर संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. भेसळखोरीला आळा बसावा यासाठी प्रशासन सरसावले असून जिल्ह्यात कार्यवाहीला सुरुवात करण्यात येणार आहे.

Eknath Khadse : राजकारणातली मोठी चूक कोणती? नाथाभाऊंनी बेधडक सांगितलं

दूध हे अनेक पोषक घटकांनी परिपूर्ण असते. यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वे (Milk Adulteration) मिळत असतात. मात्र आजकाल काही व्यापारी तसेच व्यावसायिक हे लालसेपोटी व कमी काळात अधिक नफा मिळविण्याच्या नादात दुधात भेसळ करू लागले आहेत. या भेसळखोरीचा परिणाम थेट नागरिकांच्या जीवाशी होऊ लागला आहे. या प्रकारांना आळा बसावा, जनतेला चांगले दुध मिळावे या उद्देशाने दुधात होणार्‍या भेसळविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता शासनाला कठोर पाऊले उचलावी लागली आहेत.

दरम्यान, प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या या आदेशात अन्न औषध प्रशासन विभागाने (Milk Adulteration) स्वतंत्रपणे चार पथके तयार करून तालुकानिहाय आपल्या कार्यालयातील मनुष्यबळ आणि वाहनासह दूध संकलन केंद्र, दुध संकलन संस्था, प्रकल्प याठिकाणांहून दुधाचे नमुने घेऊन त्याची तपासणी करून भेसळ करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे.

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली; दोन जणांचा मृत्यू; 5 जण जखमी

अशी राबविली जाणार तपासणी मोहिम

या तपासणी मोहिमेत सुरूवातीला (Milk Adulteration) मोठ्या संस्था आणि संकलन केंद्र आणि त्यानंतर छोटे संकलन केंद्र आणि प्रकल्प यांची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहेत. त्यानूसार आजपासून जिल्ह्यातील दुध संकलन करणारे केंद्र, प्रकल्प आणि दूधाची विक्री होणार्‍या ठिकाणी तपासणी मोहिम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात याआधीही कारवाया झाल्या आहेत. मात्र, त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. छुप्या मार्गांनी दुधात भेसळ होतच आहे. असे आरोग्यास धोकादायक असलेले दूध लोकांच्या पोटात जात आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने दूध भेसळखोरांविरोधात पुन्हा धडक मोहिम हाती घेतली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube