Download App

फडणवीसांचा मिश्किल संवाद पण शिंदेंनी ढुंकुणही पाहिलं नाही; ठाकरे, शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीची चर्चा

Udhhav Thackeray, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नजरानजर भेटीची काय झालं नमकं या भेटीत जाणून घेऊ...

Udhhav Thackeray, Devendra Fdanvis and Eknath Shinde meet : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळ सभागृहात सादर केला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मात्र त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती बजेटनंतर विधानसभेच्या लॉबीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नजरानजर भेटीची काय झालं नमकं या भेटीत जाणून घेऊ…

‘फक्त खुर्च्यांची अदलाबदल…’शिंदेंच्या डोक्यातून ‘ते’ जाईना, पवारांनी CM फडणवीसांना मारला डोळा अन् मंचावर हशा

उद्धव ठाकरे अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर हे लिफ्टजवळ उभे असताना फडणवीस तेथून जात होते. त्यावेळी त्यांची नजरानजर होताच ठाकरेंना फडणवीसांनी नमस्कार केला. तर ठाकरेंनी फडणवीसांना मर्सिडीजचे भाव वाढवले नाही का? असा मिश्किल सवाल विचारला असता उपस्थितांमध्ये हसा पिकल्याचं पाहायला मिळालं.

पुनित बालन ग्रुप तर्फे ‘फ्रेंडशिप करंडक’ 2025 क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा आयोजित, रमणबाग फायटर्सला विजेतेपद

दुसरीकडे मात्र ज्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे याच लॉबीमधून एकमेकांपासून गेले तेव्हा त्यांनी नजरानजर देखील केली नसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे फडणवीसांच्या मागेच असलेल्या शिंदे यांच्याकडून करण्यात आलेलं दुर्लक्ष स्पष्ट दिसलं. ज्या कॅमेऱ्याने ठाकरे फडणवीसांमधील खेळीमेळीचं वातावरण टिपलं त्याचं कॅमेऱ्याने शिंदे ठाकरेंमधील दुरावा देखील टिपला आहे. बंड केल्यानंतर ठाकरे आणि शिंदे पहिल्यांदा असे एकत्र आले होते. मात्र त्यांनी एकमेकांकडे पाहिलं देखील नाही.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे पडणवीसांनी एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चा झाल्या होत्या. तसेच अनेकदा सार्वजनिक ठिकाणी देखील फडणवीसांनी आपल्यात संवाद होऊ शकतो. असं विधान केल्यानंतर ठाकरे आणि भाजपच्या जवळीकीवरून त्यांच्या एकत्र येण्याच्या देखील चर्चा झाल्या होत्या. त्यामुळे देखील शिंदे फडणवीसांमध्ये दुरावा येत असल्याच्या देखील चर्चा त्यावेळी झाल्या होत्या.

follow us