Download App

अजित पवारांवर बोलावं इतकी आपली पात्रता नाही, उमेश पाटलांनी घेतला जानकरांचा समाचार

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Umesh Patil On Uttam Jankar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही आपण पक्षातून काढू शकतो असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी केल्याने नवीन वादाला तोडं फुटलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी उत्तम जानकर याच्यावर जोरदार पलटवार केलाय. अजित पवारांना (Ajit Pawar) मी पक्षातून काढून टाकू शकतो असं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वक्तव्य जानकरांनी (Uttam Jankar) केलं आहे अशा शब्दांद पाटील यांनी जानकर यांचा जोरदार समाचार घेतलाय.

 

धैर्यशील मोहिते पाटलांना दिलासा, निंबाळकरांनी घेतलेला ‘तो’ आक्षेप फेटाळला!

 

जनताच धडा शिकवील

ज्या मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातील धनगर समाजावर अन्याय केला. त्यांच्या विरोधात लढणारा कार्यकर्ता म्हणून उत्तम जानकरांची ओळख होती. मात्र, उत्तम जानकरांनी या लोकांना वाऱ्यावर सोडून मोहिते पाटलांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या उत्तम जानकरांना येथील जनता ओळखून आहे. यांना जनताच धडा शिकवील असंही पाटील यावेळी म्हणाले.

 

उत्तम जानकर हे लबाड

उत्तम जानकर यांना फक्त आणि फक्त आमदारकीचा शब्द मिळाल्याने ते मोहिते पाटलांसोबत गेलेले आहेत असा खळबळजनक दावाही उमेश पाटील यांनी जानकर यांच्याबद्दल केला आहे. तसंच, उत्तम जानकर हे किती लबाड आणि फसवे आहेत हे सिद्ध झालं असून, ते येथील जनता नक्कीच विसरणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

 

मी फाउंडर सदस्य, अजितदादांनाही पक्षातून काढू शकतो’; उत्तम जानकरांची फटकेबाजी

 

काय म्हणाले होते जानकर?

पक्षाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यावर बोलताना, उत्तम जानकर म्हणाले, मला काही अजून पक्षातून काढून टाकलेलं नाही.. मीही रोज विचारतोय की मला पक्षातून काढलय का? कारण मी संस्थापक सदस्य आहे. जर मनात आणलं तर मीच अजित पवार यांना पक्षातून काढून टाकू शकतो असा थेट इशाराच उत्तम जानकर यांनी दिला होता.

follow us

वेब स्टोरीज