धैर्यशील मोहिते पाटलांना दिलासा, निंबाळकरांनी घेतलेला ‘तो’ आक्षेप फेटाळला!

धैर्यशील मोहिते पाटलांना दिलासा, निंबाळकरांनी घेतलेला ‘तो’ आक्षेप फेटाळला!

Dhairayasheel Mohite Patil : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील (Dhairayasheel Mohite Patil) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महायुतीचे (Mahyuti) उमेदवार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेतले होते. आज या प्रकरणात सुनावणी झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर (Monika Singh Thakur) यांनी मोहिते पाटील यांना मोठा दिलासा देत प्रतिज्ञापत्रावर घेतलेल्या आक्षेप फेटाळून लावले आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात व्यवसाय संबंधित कॉलम रिकामा सोडल्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याचा आक्षेप भाजप उमेदवार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतले होते. या प्रकरणात आज सुनावणी पार पडली असून निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी सुनावणीअंती मोहिते पाटलांचा अर्ज वैध ठरवला.

भारतीय जनता पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले होते. यामुळे त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला होता. पक्षप्रवेशांतर शरद पवार गटाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

हाच का तुमचा स्वाभिमान?, अजित पवारांवर रोहित पवारांचा घणाघात

यामुळे माढ्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदली आहे. यातच पुन्हा एकदा माढ्यात भाजपाला मोठा धक्का बसला असून उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे माढ्यात भाजपसाठी पेपर टफ असल्याचे बोलले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube