सोलापूरकर बीडचं पार्सल बीडला नाही तर दिल्लीला पाठवणार; सातपुतेंच मोहिते पाटलांना प्रत्युत्तर

सोलापूरकर बीडचं पार्सल बीडला नाही तर दिल्लीला पाठवणार; सातपुतेंच मोहिते पाटलांना प्रत्युत्तर

Ram Satpute on Dhairyashil Mohite Patil :लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. काल धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुतेंव (Ram Satpute) जोरदार टीका केली होती. तुझं पार्सल एका रात्रीत बीडला परत पाठवणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्याला राम सातपुतेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

महायुतीत नवा ट्विस्ट! नारायण राणेंना मतदान करा; दीपक केसरकरांचं आवाहन 

सोलापूरकरांनी मला दिल्लीला पाठवायचं ठरवलं आहे, तसेच विकासकामांसाठी पार्सल घेऊन दिल्लीला जाईल, असं राम सातपुते म्हणाले.

राम सातपुतेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, निश्चितच मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. उसतोड कामगाराचा मुलगा आहे. एका गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला हिणवायचं काम हे धनदांडगे लोक करतात. मी याला टीका म्हणणार नाही, ही धमकी समजतो. ती धमकी एका गरिबाच्या मुलाला धनदांडग्यांनी दिली आहे. सामान्य परिवारातील मुलगा इथंपर्यंत आला असेल म्हणून त्याचा त्रास होत असेल, गरिबाला हीणवून नका, असा टोलाही सातपुतेंनी लगावला.

“अलबत्या गलबत्या” लवकरच थ्रीडीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला, टीझरला सोशल मीडियावर जबरदस्त रिस्पॉन्स 

पुढं बोलतांना ते म्हणाले, माझ्या आई-वडिलांनी या सोलापूर जिल्ह्यात रक्त सांडलं. घाम गाळला. मोहिते पाटील परिवारामधील मोठे दादा यांचा मी आजही आदर करतो. त्यांच्या विरोधात बोलणार नाही. पण, सोलापूरकर बीडचे पार्सल बीडला नाही तर दिल्लीला पाठवतील. त्यात पार्सलमध्ये सोलापूरचे प्रश्न, सोलापूरचा विकास असेल. जिथं पाणी नाही, तिथं पाणी न्यायचं. दुष्काळी गावाला पाणी आणण्यासाठी कागदपत्रे निश्चितपणे पार्सल घेऊन जाईल, असं सातपुते म्हणाले.

राम सातपुतेंनी उत्तम जानकर यांच्याबाबत खुलासा केला. माळशिरसमधून नक्कीच चांगली बातमी येईल आणि उत्तम जानकर भाजपसोबत जातील, ते सोबत येणार असल्यानं माळशिरसमधून मोठा लीड मिळणार असल्याचं सातपुते म्हणाले.

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube