Download App

तालुक्याचा अन् नळदुर्गचा कायापालट करायचा आहे, सर्वांनी सहकार्य करावं ; राणाजगजितसिंह पाटील यांचं आवाहन

  • Written By: Last Updated:

Nitin Gadkari Sabha For Ranajagjitsinha Patil In Naldurga : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे राणाजगजितसिंह पाटील ( Ranajagjitsinha Patil हे उमेदवार आहेत. राणा पाटलांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी आज भाजपचे जेष्ठ नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी राणाजगजितसिंह पाटील यांनी जाहीर सभेला संबोधित केलंय. राणा पाटील म्हणाले की, नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांच्यामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलत आहे, नॅशनल हायवे झाले आहेत.

हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत देशभर विकासाचं काम केलंय. तसंच काम त्यांनी जिल्ह्यात केलंय. आपल्या जिल्ह्यात सर्व महत्वाचे प्रकल्प रेल्वे, पाणी हे रखडले होते. पण महायुतीच्या सरकार आल्यानंतर उजनीचं पाण्याच्या प्रकल्पाला मंजूरी मिळाली आहे. कायापालट होणार आहे, तिरूपतीसारखं आई तुळजाभवानीचं मंदिर होणार असल्याचं राणा जगजितसिंह पाटील म्हणाले आहेत. नळदु्र्गचा देखील कायापालट होत आहेत. नळदुर्गजवळ एमआयडीसी होतेय. येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे.

डॉ. अतुलबाबा भोसलेंसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात, शुक्रवारी मलकापुरात घेणार जाहीर सभा

लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून खरं काय ते जनतेसमोर आणलंय. यावरून विरोधक आता तीन हजार महिना देण्याचं म्हणत आहेत. विरोधकांवर थोडाही विश्वास ठेवू नका, असं आवाहन भरसभेमध्ये राणाजगजितसिंह पाटील म्हणाले आहेत. यावेळी येणाऱ्या 20 तारखेला ऐतिहासिक मताधिक्य मिळवून देणार का? असा सवाल राणाजगजितसिंह पाटील यांनी केलाय. आपल्याला एक-एक मत वाढवायचं आहे. प्रत्येक कुटुंब जोडायचं आहे, असं प्रतिपादन राणा जगजितसिंह पाटील यांनी केलंय.

संभाजीभैय्यांच्या नेतृत्वावर विश्वास…झरी आणि गुऱ्हाळ येथील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश!

आपल्या तालुक्याचा आणि नळदुर्गचा कायापालट करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन राणा पाटलांनी केलंय. यावेळी राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की, मी विरोधकांवर जास्त बोलणार नाही. महायुती सरकारने निराधारांना रोजगार उपलब्ध करून दिला, असं म्हणत त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावं यासाठी जनतेला आवाहन केलंय. यावेळी तरूण, महिला आणि पुरूषांची मोठी गर्दी सभास्थळी पाहायला मिळाली.

 

follow us