संभाजीभैय्यांच्या नेतृत्वावर विश्वास…झरी आणि गुऱ्हाळ येथील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश!

संभाजीभैय्यांच्या नेतृत्वावर विश्वास…झरी आणि गुऱ्हाळ येथील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश!

Support Sambhaji Patil Nilangekar In Assembly Election : राज्यात मतदान काही दिवसांवर येवून ठेपलंय. अशातच निलंगा मतदारसंघामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. तेथील महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांची ताकद वाढताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर आज मतदारसंघातील झरी आणि गुऱ्हाळ येथील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी आदरणीय संभाजीभैय्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

मतदारसंघाचा सातत्याने होत असलेला विकास हा प्रत्येकालाच प्रेरणा देणारा आहे. भैय्यासाहेबांच्या नेतृत्वात या विकास यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण प्रवेश (BJP) करत असल्याची भावना सर्वांनी यावेळी बोलून दाखवली. दिपकजी बिरादार, ज्ञानेश्वरची माकणे, प्रेमजी मोरे, ऋषिकेशजी बिरादार, सागरजी बिरादार, सुदर्शनजी जाधव, अविनाशजी रासुरे, सदाशिवजी जाधव, निखिलजी चव्हाण, संकेतजी जाधव, रोहितजी माने या झरी येथील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय.

पुढील पिढीला सत्याची शिकवण द्यायची असेल, तर सत्तापरिवर्तन करावं लागेल; राहुल कलाटे

गुऱ्हाळ येथील किसनजी मुगनाळे, बालाजी माने जी, अशोकजी माने, गिरीशजी धनुरे, विजयजी माने, भिकाजी सुरवसे जी, नामदेवजी शेळके, अंकुशजी धनुरे, सुनीलजी जाधव, शशिकांतजी धनुरे, दयानंदजी जाधव, व्यंकटजी वाडीकर या कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याचं समोर आलंय. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच संभाजी पाटील निलंगेकर यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

माजी खासदार तनपुरेंनी धमकावलं; कर्डिले समर्थक बाचकरांची पोलिसांत धाव

जामगामध्ये देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्व आणि भाजपा-महायुतीच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवत, काही दिग्गज मंडळी आणि निलंगा येथील वंचित बहुजन आघाडीच्या शहर कार्यकारिणी, कार्यकर्ते आणि असंख्य महिला भगिनींनी भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय. निलंगा मतदारसंघ आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आदरणीय भैय्यासाहेब आणि महायुती हाच सक्षम पर्याय आहे. त्यांच्यासह विकासाच्या यात्रेत कायम सोबत राहू, असा संकल्प यावेळी सर्वांनी केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube