Vadgaonsheri Assembly Constituency : कळस गावातील अनेक प्रश्न मार्गी लावणार; बापूसाहेब पठारेंचा शब्द

कळस गावातील कचरा वर्गीकरण प्रश्न मार्गी लावला जाईल. मोठ्या लोकवस्तीला कचरा वर्गीकरणाचा मोठा प्रश्न भेडसावत आहे.

Bapusheb Pathare

Bapusheb Pathare

Vadgaonsheri Assembly Constituency : वडगावशेरी विधानसभा (Vadgaonsheri) मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusheb Pathare) यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी तुफानी प्रचार पदयात्रेने राजकीय वातावरण ढवळून काढले.

बापूसाहेब पठारेचं विजयी होणार, सुप्रिया सुळेंना पूर्ण विश्वास; विद्यमान आमदारालाही ठणकावलं!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते  प्रकाश (अप्पा) म्हस्के,उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक सहभागी झाले. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी आपल्या प्रचारात जोरदार गती दिली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेपाठोपाठ  लोहगाव परिसरात आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी  ४ ते रात्री ८ या वेळेत प्रचार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कळस भागात प्रकाश अप्पा म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार पदयात्रा काढून मतदार संपर्क करण्यात आला. ‘घरोघरी संपर्क असलेले उमेदवार म्हणून उच्चांकी मतदानाने बापूसाहेब पठारे निवडून येतील आणि वडगाव शेरीत नवा राजकीय इतिहास घडविला जाईल’,असे उद्गगार प्रकाश म्हस्के यांनी काढले. 

‘छठ पूजे’च्या कार्यक्रमाला बापूसाहेब पठारे यांची हजेरी! नागरिकांना दिल्या शुभेच्छा


कळसच्या सर्व समस्या सोडवू : बापूसाहेब पठारे 

प्रचार पदयात्रेदरम्यान मतदारांशी संपर्क साधताना बापूसाहेब पठारे म्हणाले, कळस गावातील कचरा वर्गीकरण प्रश्न मार्गी लावला जाईल. मोठ्या लोकवस्तीला कचरा वर्गीकरणाचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. सध्याच्या व्यवस्थेमुळे लोकवस्तीला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भटके श्वान वाढले आहेत. नागरिकांना त्यांच्यापासून भिऊन वावरावे लागत आहे. अमेनिटी स्पेसचा वापर प्रभावीपणे व्हावा, अशी मागणी आहे. भाजी मंडईपासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्याचे काम केले जाणार आहे. परिसरातील स्मशानभूमीत सुरक्षितता नाही. तेथे अनेक गैरप्रकार चालतात. ते बंद केले जातील. पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सुविधा वाढविल्या जातील. येणाऱ्या काळात या सर्व मुद्यांना न्याय दिला जाईल, असे बापूसाहेब पठारे यांनी सांगितले. 

Exit mobile version