निष्क्रिय आणि बदनाम उमेदवाराविरुद्ध आवाज उठवला; प्रचाराची सांगता करताना पठारेंनी टिंगरेंना घेरले

  • Written By: Published:
निष्क्रिय आणि बदनाम उमेदवाराविरुद्ध आवाज उठवला; प्रचाराची सांगता करताना पठारेंनी टिंगरेंना घेरले

Vadgaon Sheri Assembly Constituency: पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात (Vadgaon Sheri Assembly Constituency) महाआघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) आणि महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्यामध्ये लढत होत आहे. पठारे यांनी शरद पवार (Sharad Pawar) सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह आघाडीतील नेत्यांच्या जोरदार सभा घेतल्या आहे. पोर्शे कार अपघातप्रकरणावरून आमदार सुनील टिंगरे यांना आघाडीच्या नेत्यांनी घेरले आहे. पठारे यांच्यासाठी जोरदार रॅल्या, सभा झाल्या आहेत.

Bapusaheb Pathare : बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीमध्ये महिलांचा झंझावात>

बापूसाहेब पठारे यांनी प्रचाराची सांगता करताना विजयाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या निवडणूक चिन्हावरच जास्तीत जास्त शिक्का पडणार आहे. माझा विजय पक्का आहे. आमचे दैवत शरद पवार महाविकास आघाडीचा प्रचार आणि मी राबवलेली नियोजनबद्ध प्रचार मोहीम याला यश मिळाले असल्याचा दावा बापूसाहेब पठारे यांनी प्रचाराची सांगता करताना केला. निष्क्रिय आणि बदनाम उमेदवाराविरुद्ध आम्ही आवाज उठवला आणि आम्हाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला.

ख्रिस्ती समाजाच्या समस्या विधानसभेत मांडू आणि सोडवू; बापूसाहेब पठारेंचा निश्चय

सोबतीला स्थानिक प्रश्न देखील आम्ही जोरात उपस्थित केले. मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेत्यांची उपस्थिती, तळागाळात केलेल्या पदयात्रा आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळे माझा विजय निश्चित झाला आहे,असेही त्यांनी सांगितले. मतदार संघाबाहेरचे कोणतेही भावनिक प्रश्न आणि द्वेष निर्माण करणाऱ्या मोहिमा या विधानसभा मतदारसंघात चालल्या नाहीत. कारण हा विधानसभा मतदारसंघ मिनी इंडिया आहे आणि त्यांना सुरक्षित आणि प्रगतिशील कारभार देण्याचा निर्धार आम्ही केला आहे,असे त्यांनी आवर्जून सांगीतले. सर्वांचे आभार त्यांनी मानले आणि निकोप लोकशाही, संविधान प्रणित विकासाचा कारभार यासाठी सुजाण मतदार म्हणून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube