Download App

२७ जागा आणि जरांगेंना उमदेवारी द्या, वंचितचा महाविकास आघाडीला प्रस्ताव, ऐनवेळी लिहिली ‘ती’ अट

  • Written By: Last Updated:

Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मुंबईत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाही (Vanchit Bahujan Aghadi) सहभाग होता. याच बैठकीत वंचितने महाविकास आघाडीला एक प्रस्ताव दिला. यात वंचितने जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला सुरूवात झाली आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री वेडिंग, खास विधीचे पाहा फोटो 

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर वंचितचे प्रतिनिधी 27 फेब्रुवारीच्या बैठकीला पाठवण्यात आला होता. या बैठकीत महाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तीन पक्षांनी ठरवून दिलेला जागावाटपाचा फॉर्म्युला आम्हाला देण्याची मागणी वंचितचे प्रतिनिधी धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती. त्यानंतर आम्ही तुम्हाला ती माहिती देऊ, असे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले. दरम्यान, आज (दि. 28) पुन्हा महाविकास आघाडीची बैठक झाली.

‘फडणवीसांनी चुकीच्या ठिकाणी हात घातला’; क्लिपचा उल्लेख करीत जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल 

सलग दुसऱ्या दिवशी जागावाटपासंदर्भात झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीकडून चार प्रतिनिधी पाठवण्यात आले. या बैठकीत वंचितने चार प्रमुख प्रस्ताव ठेवले. त्यात वंचितसाठी २७ जागांच्या प्रस्तावाचाही समावेश आहे.याशिवाय, वंचितकडून निवडणुकीची तयारी करण्यात आलेल्या २७ जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे सादर करण्यात आला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून आणि पुण्यातून डॉ.अभिजित वैद्य यांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हमून घोषित करण्याची मागणीही या बैठकीत करण्यता आलीी.

यासोबतच मविआच्या उमेदवारांच्या यादीत 15 ओबीसी आणि 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत, अशा चार प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे केल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रस्तावाममध्ये अखेरचा मुद्दा हाताने लिहिल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

या प्रस्तावासोबतच वंचितने महाविकास आघाडीला आणखी काही अटीही टाकल्या आहेत. ज्या लोकसभा मतदारसंघात वंचितने कोणत्याही पक्षाशी युती न करता पूर्ण ताकदीने निवडणुकीची तयारी केली होती, त्या लोकसभा मतदारसंघाची यादी देण्यात आली. तर महाविकास आघाडीतील घटकांनी लेखी वचन दिलं पाहिजे की, त्यांचा पक्ष किंवा निवडणून आलेला उमदेवार निवडणुकीपूर्वी आणि नंतर भाजपात प्रवेश करणार नाही, असा प्रस्तावही वंचितकडून देण्यात आला.

follow us