Suresh Dhas Enquiry Demands In Somnath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात (Somnath Suryawanshi case) सुरेश धस यांची चौकशी करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) करण्यात आलीय. वंचितच्या या मागणीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुरेश धस यांचे (Suresh Dhas) कॉल डिटेल तपासा. त्यांचे कोणासोबत फोन झाले याचा देखील तपास करा, अशी मागणी पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय.
सुरेश धस यांचा वक्तव्य आंबेडकर समाजाला चीड आणणारं आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी ओंकार कांबळे यांनी म्हटलंय. सोमनाथ सूर्यवंशी यांना केलेली मारहाण ही साधी नव्हती.त्यांच्या अंगावर काठ्या तोडण्यात आल्या. त्याचा गुन्हा इतकाच होता की, पोलीस ज्या पद्धतीने थर्ड डिग्री मारहाण करत होते, त्याचा त्यांनी व्हिडिओ केला होता. सुरेश धस यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार हे वक्तव्य करत आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे हे काम असल्याची टीका ओंकार कांबळे यांनी केलीय.
पालकमंत्रिपदाचा वाद कधी मिटणार? एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, अजितदादांसोबत बैठक…
आम्ही आंबेडकरी जनता म्हणून सुरेश धसांना एक सांगतो की, तुम्ही यात मध्ये पडू नका. हा लढा आंबेडकरी जनतेने हाती घेतलेला आहे. तो आम्ही पार पाडू. तुम्ही यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही, असा इशारा देखील कांबळे यांनी दिलाय. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुरेश धस यांची चौकशी झाली पाहिजे, आमचा संशय सुरेश धस यांच्यावर आहे, असं विधान त्यांनी केलंय.
सुरेश धस कोणत्या हेतूने म्हणत आहेत पोलिसांना माफ केलं पाहिजे? सुरेश धस यांचे कॉल डिटेल तपासले पाहिजेत. त्यांचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याचे देखील चौकशी झाली पाहिजे. त्यांचे कोणासोबत कॉल झाले आहेत, हे देखील तपासले पाहिजे असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते ओंकार कांबळे यांनी केलंय.
सरपंच हत्त्येप्रकरणी आका आका म्हणत आरोपींना फाशी देण्याची मागणी करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्या प्रकरणात पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा, असं आवाहन केलंय. पोलिसांना माफ करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका, अशी मागणी धस यांनी केली होते. त्यामुळे आता राज्यभर संतापाचे पडसाद पाहायला मिळत आहेत.