Download App

मविआतील घटक पक्षांनी चादर पाहून जागा मागाव्या; प्रकाश आंबेडकरांचा सूचक इशारा

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुक (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतशी महाविकास आघाडीत जागावाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचाही (Vanchit Bahujan Alliance) या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) समावेश झाला आहे. मात्र, अद्याप जागावाटपाबाबत एकमत झालेले नाही. कॉंग्रेस आणि ठाकरे गटाकडून जास्त जागा मागितल्या जात आहे. यावरून आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीला ठणकावलं. प्रत्येकाने चादर पाहून जागा मागाव्यात, असा सूचक इशारा त्यांनी दिला.

मनगट आमच्याकडेच, फक्त घड्याळाची चोरी; जितेंद्र आव्हाडांचा घणाघात

प्रकाश आंबेडकर यांना आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना महाविकास आघाडीच्या जागावाटपाविषयी विचारले. त्यावर बोलतांना आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीचे स्वरूप काय असेल? याचं उत्तर माझ्याकडे नाही. याचे उत्तर मविआच्या सर्व पक्षांकडे आहे. एकत्र लढायचे की वेगळंवेगळं, हे आधी ठरवलं पाहिजे, मविआला एकत्र लढायचे असेल तर सर्वांनी त्या विचाराल चिकटून राहिलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेणार? अमोल मिटकरींनी स्पष्टच सांगितलं 

पुढं बोलतांना आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कोणीही मोठा नाही. म्हणून थोरल्या भावाची भूमिका मागे ठेवली पाहिजे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 48 जागांवर निवडणूक लढवावी, अशी आमच्या पक्षाची भूमिका होती. मात्र आता महाविकास आघाडीशी चर्चा सुरू असल्याने आम्ही ती भूमिका बाजूला ठेवली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने 24 तर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 23 जागा मागितल्या आहेत. या दोघांची मागणी 47 जागांची आहे. दोन्ही पक्ष एकाच मागणीवर ठाम राहिले तर काय उरणार?’ असा सवाल आंबेडकरांनी केला.

ते म्हणाले, काँग्रेसने 24 तर शिवसेनेने 23 जागांची मागणी केली आहे. दोघेही त्यावर ठाम राहिले तर चर्चा कशी पुढं जाईल? यामध्येच 47 जागा गेल्या. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पदरात बघून जागांची मागणी करावी, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर म्हणाले की, 1977 मध्ये विरोधी पक्षांची झालेली एकी पाहता आम्ही किमान समान कार्यक्रमाची मागणी केली आहे. आता त्याची जबाबदारी कॉंग्रेसने घेतली आहे. आम्ही किमान समान कार्यक्रमासाठी उद्यापर्यंत आमचे मुद्दे देऊ. त्यानंतर कॉंग्रेसने सर्व पक्षांचा एक किमान समान कार्यक्रमक करावा, अशी त्यांची जबाबदारी आहे.

मुस्लिम वगळून आमच्याकडे अडीच लाख मते आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात 60 लाख मते मिळाली होती. आज उद्योगपती मोदी-मोदी करत आहेत. मात्र, पुढच्या टर्ममध्ये मोदी मोठ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी उद्योगपतींना उद्ध्वस्त करतील, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही आंबेडकरांनी दिला.

14 मतदारसंघांवर अद्याप निर्णय झालेला नाही
दरम्यान, मविआमधील जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे वृत्त असून लोकसभेच्या 48 जागांपैकी 34 जागांचे वाटप जवळपास पूर्ण झाल्याचे समजते. मात्र, उर्वरित 14 जागा कोणता पक्ष लढवणार याची चर्चा सुरू आहे. ज्या 14 मतदारसंघांवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यात वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि शिर्डी यांचा समावेश आहे.

 

follow us