Download App

बॅनरवर शिंदे-फडणवीसांचे फोटो नसल्यानं ठाकरे गट आणि भाजप यांच्यात शाब्दिक वाद

  • Written By: Last Updated:

Verbal dispute between Thackeray group and BJP due to absence of Shinde-Fadnavis photos on the banner : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला भाजपची फूस होती, असा अनेकदा आरोप होतो. त्यामुळं भापज, शिंदे गट विरूध्द ठाकरे गट हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ठाकरे गटाकडून कायम भाजप आणि शिंदे गटावर टीकास्त्र डागलं जातं. ठाकरे गटाचे नेते शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान आताही छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात भाजप (BJP) आणि शिवसेना (shivena) नेत्यांमध्ये पुन्हा एकदा चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं.

महात्मा बसवेश्वर जयंतीच्या आयोजित कार्यक्रमात सहकार मंत्री अतुल सावे आणि ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खेरै यांनी एकमेकांना टोले लगावले. सार्वजनिक कार्यक्रमात ठाकरे गट आणि भाजपा नेत्यामध्ये शाब्दीक चकमक झाल्यानं याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीसांचा फोटो नसल्यानं मंत्री सावेंनी चंद्रकांत खैरेंवर जोरदार टोलेबाजी केली. यावेळी आपल्या भाषणात अतुल सावे यांनी सांगितले की, लिंगायत समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र मंडळ निर्माण केले. या मंडळामार्फत समाजातील तरुणांना शिक्षणाच्या संधी, नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. मात्र, तरीही कार्यक्रम पोस्टवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो छापले नाही, याची खंत वाटते, असं ते म्हणाले.

Covid19 : राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये, मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष

यावेळी बोलतांना मंत्री अतुल सावे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टोलेबाजाी केला. जे लोक मोठे आहेत, त्यांना मोठे म्हणायला शिका खैरे साहेब… इतरांचं मोठंपण अमान्य करून आपण मोठं होत नसतो,असा चिमटाही चंद्रकांत खैरेंना काढला.

मग चंद्रकांत खैरे यांनीही अतुल सावे यांचा जोरदार समाजार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो का छापला नाही, असं विचारणाऱ्या सावेंना महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवायला तुमच्या निधीची गरज नसल्याचा टोमणा मारला आहे.

यावेळी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त भाजपचे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Tags

follow us