Vidhan Parishad Election 2026: गृहमंत्री अमित शाह, फडणवीसांनी शब्द पाळला…विवेक कोल्हेंना ‘नवसंजीवनी’

Vidhan Parishad Election 2026-विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत.

Vivek Kolhe

Vivek Kolhe

Vidhan Parishad Election 2026 : राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकांच्या (Vidhan Parishad Election 2026) उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून 5 नावांची घोषणा झाली आहे. अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंना (Vivek Kolhe) विधानपरिषदेची संधी मिळाली आहे. विवेक कोल्हे यांचं नाव निश्चित झाल्याच्या कालपासून चर्चा सुरु होत्या. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. यातच आज त्यांच्या नावाची घोषणा झाल्याने गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळला असल्याचे देखील अधोरेखित झाले.

2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे विवेक कोल्हे हे कोपरगाव मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र विद्यमान आमदार आशुतोष काळे देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महायुतीच्या वरिष्ठांना कोल्हे यांना थांबण्याची विनंती केली. कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने काळे हे आमदार झाले. यामुळे कोल्हे यांचे पुढील राजकीय भवितव्य काय असा सवाल निर्माण झाला.

मात्र त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही त्यांची योग्य दाखल घेतली जाईल असा शब्द भाजपच्या वरिष्ठांकडून कोल्हे यांना देण्यात आला होता. आता त्यांनतर कोल्हे यांचे नाव विधान परिषदेसाठी चर्चेत असल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते अशी चर्चा राजकारणात रंगू लागली होती. अखेर कोल्हे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे.

विवेक कोल्हे नेमके आहेत तरी कोण?

नगर जिल्ह्यात कोल्हे परिवाराचे वर्चस्व मानले जाते. विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. विवेक कोल्हे उच्चशिक्षित असून बीई सिव्हील आहे. भूषवित असलेली पदे देखील महत्वाची असून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह संचालक, महाराष्ट्र राज्य सह. साखर कारखाना संघाचे संचालक आहेत.


जिल्ह्याला तीन विधानपरिषद सदस्य

जिल्ह्यात आता विधानपरिषदेचे तीन सदस्य झाले आहेत. प्रा. राम शिंदे हे विधानपरिषदेवर असून, ते विधानपरिषदेचे सभापती आहेत. तर नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे हे विधानपरिषदेवर आहेत. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून एक जण विधानपरिषदेवर निवडला जातो. झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्याने ही जागा रिक्त आहे. झेडपीची निवडणूक झाल्यानंतर आणखी एक जण विधानपरिषेदवर जाईल. त्यामुळे जिल्ह्यात चार विधानपरिषदेचे सदस्य होणार आहे.

Exit mobile version