Download App

Vidhan Parishad Election : इतिहासात पहिल्यांदाच एकही मुस्लिम आमदार नाही…

विधानपरिषदेत काँग्रेसचे आमदार वजाहत मिर्झा, आणि राष्ट्रवादीचे आमदार अब्दुल्ला खान दुर्राणी यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे आता इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत एकही मुस्लिम आमदार नसणार आहे.

Vidhan Parishad Election : राज्यात येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेच्या (Vidhan parishad) एकूण 11 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, चालु महिन्यातच काही आमदारांचा कार्यकाळ संपणार आहेत. यामध्ये काँग्रेसचे वजाहत मिर्झा, (Vajahat Mirza) राष्ट्रवादीचे अब्दुल्ला खान दुर्राणी (Abdul Khan Durrani) यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै संपणार आहे. या दोन्ही आमदारांचा कार्यकाळ संपल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानपरिषदे एकही मुस्लिम आमदार नसणार आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ही गोष्ट घडत आहे.

मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स लोगोचे अनावरण, आदित्य ठाकरेंची उपस्थिती अन् मोठी घोषणा

राज्यात 12 टक्के मुस्लिम समाजाची संख्या असून त्या तुलनेत मुस्लिम समाजाला पुरेसं प्रतिनिधीत्व दिलं पाहिजे, अशी सातत्याने मागणी महाविकास आघाडीकडे केली जात आहे. यासंदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी राज्यातील मुस्लिमांना लोकसंख्येनूसार प्रतिनिधित्व दिलं जावं, अशी मागणी महाविकास आघाडीकडे केली.

राज्यात 1937 पासून द्विसदन विधानसभा आहे. वरिष्ठ सभागृहात मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व नेहमीच होते. विधान परिषदेत एकूण आमदारांची संख्या 78 आहे, अनेक रिक्त जागांसह सध्याचे संख्याबळ 51 आहे. अशातच आता काँग्रेसचे आमदार मिर्झा आणि राष्ट्रवादीचे दुर्राणी 27 जुलै रोजी निवृत्त होत आहेत.

Anant Radhika ला लागली हळद! राधिका मर्चंटच्या मोगऱ्याच्या ओढणीने वेधले लक्ष, पाहा फोटो

शेख म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुस्लिम बहुसंख्य असलेल्या राज्यातील 14 लोकसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार उभा केला नाही. राज्य अस्तित्वात आल्यापासून, 567 खासदार निवडून आले, त्यापैकी मुस्लिम समाजाला फक्त 15 (2.5%) खासदार मिळाले. AIMIM, मुस्लिम समाजाचे ध्रुवीकरण करत असल्याचंही शेख म्हणाले आहेत.

दरम्यान, विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार सध्या रिंगणात आहेत त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता आहे. ही फाटाफूट रोखण्यासाठी आता सर्वच पक्षांनी खबरदारी घेतल्याचं पाहिला मिळत आहे.

follow us