Vidhan Parishad Election Updates : ठाकरेंचा खास माणूस राजकारणात: मिलींद नार्वेकर विजयी

Vidhan Parishad Election Updates : ठाकरेंचा खास माणूस राजकारणात: मिलींद नार्वेकर विजयी

Vidhan Parishad Election Live Updates : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर आता या निवडणुकीचे निकाल हाती आले असून, लोकसभेनंतर महायुतीने जोरदार कमबॅक केल्याचे पाहण्यास मिळत आहे. महायुतीने विधानपरिषदेसाठी मैदानात उतरवलेले सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरही विजयी झाले आहेत. शेकापचे जयंत पाटील यांना केवळ 12 मते आहे. त्यामुळे नार्वेकारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

मैदानात कोण कोण?

भाजपचे उमेदवार : पंकजा मुंडे, परिणय फुके,  सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर

शिवसेना (शिंदे गट) : कृपाल तुमाने, भावना गवळी

शिवसेना (उबाठा) : मिलिंद नार्वेकर

शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार : जयंत पाटील (शेकाप)

काँग्रेस : प्रज्ञा सातव

LIVE NEWS & UPDATES

  • 12 Jul 2024 07:18 PM (IST)

    तुमच्या विकेट पाडतच राहणार : एकनाथ शिंदे

    विधान परिषदेच्या पार पडलेल्या निवडणुकांमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांचा विश्वास अधिक वाढला असून, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली असून, यात त्यांनी तुमच्या विकेट पडतच राहणार असा टोला विरोधी पक्षांना लगावला आहे.

  • 12 Jul 2024 07:15 PM (IST)

    महायुतीचे 9 उमेदवार विजयी; फडणवीसांचे एका ओळीचे ट्विट

    विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्व नऊ उमेदवारांचा विजय झाला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या एका ओळीचे ट्विट केले आहे. यात त्यांनी केवळ 9/9 आणि थंम दाखवले आहे.

  • 12 Jul 2024 07:12 PM (IST)

    MLC Election 2024 : महायुतीचे जोरदार कमबॅक; सर्वच्या सर्व उमेदवार विजयी

    विधानसभा निवडणुकीआधी विधानपरिषदेची अकरा जागांची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी परीक्षा घेणारी ठरली. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा थोडासा का होईना वचपा महायुतीने काढल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत महायुतीने एकूण 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

     

    MLC Election 2024 : महायुतीचे जोरदार कमबॅक; सर्वच्या सर्व उमेदवार विजयी

  • 12 Jul 2024 07:07 PM (IST)

    माझ्या विजयाचा आनंद लोकांना झालाय

    भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, माझ्या विजयाचा आनंद लोकांना झालाय याचा फार आनंद आहे.  जिथे जास्त योगदान देऊ शकेन तिथं चांगलं काम करेल, असा शब्द देत लोकांच्या चेहऱ्यांकडून पाहून आनंद वाटत असल्याचेही पंकजा म्हणाल्या.

  • 12 Jul 2024 07:05 PM (IST)

    अजितदादांनी 5 मतांसाठी मानले आभार

    विधानपरिषद निवडणुकीत आमच्याकडे 42 मतं होती. आम्हाला 47 मतं मिळाली आहेत. आम्हाला अधिकची 5 मतं मिळाली. त्यांचे आभार मानतो, असं अजित पवार म्हणाले.

  • 12 Jul 2024 06:36 PM (IST)

    खोत पिछाडीवर तर, नार्वेकरांना एका मताची गरज

    सदाभाऊ खोत हे 14 मते घेऊन पिछाडीवर आहेत. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरही विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना विजयासाठी केवळ एका मताची गरज आहे.

  • 12 Jul 2024 06:35 PM (IST)

    काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी

    काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव या 25 मतं मिळवत विजयी झाल्या आहेत.

  • 12 Jul 2024 06:34 PM (IST)

    शिवसेनेच्या भावना गवळी 24 मतं मिळवत विजयी

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भावना गवळी 24 मतं मिळवत विजयी झाल्या आहेत. 

  • 12 Jul 2024 06:27 PM (IST)

    अजित दादांचे दोन्ही उमेदवार विजयी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे निवडणूक लढवत होते. राजेश विटेकर यांना 23 मतं मिळाली आहेत.

  • 12 Jul 2024 06:24 PM (IST)

    भाजपने मारला विजयाचा चौकार

    विधान परिषदेच्या मतमोजणीत भाजपच्या चार उमेदवारांनी विजयाचा चौकार मारला असून, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकरांनी बाजी मारली आहे. पंकजा मुंडे यांना 26, परिणय फुके यांना 26, योगेश टिळेकर यांना 26 मतं मिळाली आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube