Ajit Pawar : भाजपने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर त्यांचे गँगस्टर दाऊदशी संबंध असल्याचा अनेकदा आरोप केला. त्यामुळं दाऊद आणि त्याच्या भावाच्या प्रकरणांशी संबंधित असलेल्या व्यक्तीचा आम्ही प्रचार करणार नाही, अशी भूमिका भाजपने (BJO) घेतली. याच भूमिकेमुळं भाजपने सुरूवातीला मलिक यांना तिकीट देण्यास विरोध केला. मात्र भाजपचा दबाव झुगारून अजित पवार (Ajit Pawar) यांनी नवाब मलिक यांना तिकीट दिले. आता मलिकांचा प्रचारही करणार असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं.
उद्या होणार ‘येक नंबर’ या मराठी ब्लॉकबस्टरचा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर, ZEE5 तर्फे मोठी घोषणा
अजित पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. नवाब मलिक यांचा प्रचार करणार का, असा सवाल केला असता अजित पवार म्हणाले, नवाब मलिक हे आमचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यामुळे मी त्यांच्या रॅलीमध्ये जाणार आहे. त्यांच्यावर आतापर्यंत फक्त आरोप झालेले आहेत. त्यांच्यावर झालेले आरोप अजून सिद्ध झाले नाहीत, त्यांना दोषी कसे ठरवता येईल. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री काय करावे हा त्यांचा अधिकार आहे, असं अजितदादा म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार? उद्या अमित शहांची तोफ धडाडणार
दरम्यान, अजित पवार गटाकडून नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
यंदा बारामती विधानसभा मतदारसंघात किती लीड मिळणार याविषयी विचारलं असता अजित पवार म्हणाले की, सध्या मी प्रचारासाठी फिरतोय, बारामतीचा संपर्ण दौरा फिरून झाल्यावर लीड सांगेन… पण एवढं शंभर टक्के सांगतो की, चांगलं लीड असेल. मतदारांशी हितगुज करून रेकॉर्ड तोडेल की नाही ते सांगतो, असं ते म्हणाले.
तुम्ही हे बंद करा – अजित पवार
सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्याविषयी विचारलं असता अजित पवार म्हणाले की, सदाभाऊ खोत यांनी यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. मी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध केलाय. खोत यांना देखील फोन करून सांगितलं की, तुमचं वक्तव्य आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही हे बंद करा, वैयक्तिक पातळीवर बोलणं चुकीच आहे. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाचं उदाहरण घालून दिलंय. आरोप-प्रत्यारोप मांडण्याची एक पद्धत असते, असं अजितदादा म्हणाले आहेत.
शरद पवार यांच्या निवृत्तीबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले, “मला माहित नाही… माझा मागचा अनुभव वेगळा आहे, म्हणून मी काय सांगत नाही, असं ते म्हणाले.