डुकराला कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते गटारातचं…; संजय राऊतांवर बोलतांना खोतांची जीभ घसरली
Sadabhau Khot : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. काल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली. त्यांच्या या टीकेमुळं वातावरण तापलेलं असतानाच खोत यांनी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही सडकून टीका केली.
तनपुरेंसाठी खासदार निलेश लंके मैदानात; राहुरी मतदारसंघ पिंजून काढला…
संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर आहेत. डुकराला कितीही साबण लावला, शाम्पू लावला तरी ते गटारातच जातं, असं खोत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, असं राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या टीकेला उत्तर देतांना सदाभाऊ खोत यांनी त्यांची तुलना डुकाराशी केली. सदाभाऊ खोत म्हणाले की, संजय राऊत यांनी आम्हाला कुत्र्याची उपमा दिली पण कुत्रे हे इमानदार असतात. ते धन्याची राखण आणि संरक्षण करतात. मात्र, राऊतांना गावगाडी माहिती नाही. त्यामुळे राखण करणारा कुत्रा म्हणजे काय आहे, हेही ठाऊक नाही, असं खोत म्हणाले. पण तुम्ही 2014 मध्ये नरेंद्र मोदींचा फोटो गळ्यात लटकवून मते मागत फिरला. 2019 लाही तेच केलं. मात्र, सत्तेत आल्यवर तुम्ही पहिला खंजीर हातात घेतला. कुत्र्याएवढा जरी इमानदारपणा असता तर महाराष्ट्राने तुमचे कौतुक केलं असते, असं खोत म्हणाले.
मला त्याच्यावर जास्त काही बोलायचे नाही. कारण डुकराला कितीही साबण आणि शाम्पू लावला तरी डुक्कर गटारात जातच असते, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
दरम्यान, गेल्या 24 तासात सदाभाऊ खोत यांनी दोन वादग्रस्त वक्तव्य केली. त्यामुळं खोत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. खोतांनी राऊतांवर केलेल्या टीकेला आता संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.