Download App

अजितदादांना मोठा धक्का! वळसे पाटील घेणार पवारांची भेट? महायुतीत खळबळ…

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • Written By: Last Updated:

Dilip Walse Patil : आगामी विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये पक्षांतर करण्याची चढाओढ सुरू झाली. त्यातच अजितदादा गटाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे लवकरच शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली. मात्र, स्वत: वळसे पाटील यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. पण, या चर्चेमुळे अजितदादा गटासह महायुतीत (Mahayuti) खळबळ उडाली होती.

पुण्यात भाजपाला मोठा धक्का! भाजप प्रदेश पदाधिकारी सचिन फोलानेंचा शरद पवार गटात प्रवेश 

शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली. त्यातच त्यांनी अजित पवारांसह भाजपला धक्कावर धक्के देण्यातही कसर सोडली नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार गटात इनकमिंग वाढली आहे. त्याला पुरक अशा घटनाही सध्या घडतांना दिसून येत आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार बबन शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर दिलीप वळसे पाटील हेही शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा पाय खोलात, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल! 

खरंतर शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून वळसे पाटील यांची यांची राज्याच्या राजकारणात ओळख होती.पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवेळी शरद पवारांची साथ सोडत अजितदादांसोबत जाणं पसंत केलं. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी वळसेंच्या आंबेगावात 2 सभा घेतल्या होत्या. त्यानंतर शरद पवार यांचे शिरूरचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांना येथे भरघोस मते मिळाली. आता देवदत्त निकम यांनी आंबेगावातून तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांनी त्यांना बळ दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाटलांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. यातून मार्ग काढण्यासाठी वळसे लवकरच शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

वळसे पाटील काय म्हणाले?
तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त फेटाळले. मी शरद पवारांना भेटणार असल्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नाही. यासंबंधीचे वृत्त निराधार आणि खोडसाळ आहे. सध्या मी माझ्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून दिवसभर सभा, बैठका घेत आहे, असं ते म्हणाले.

follow us