Download App

Vidhansabha Election : वरळी-वांद्र्यात मदत मिळावी म्हणून भिवंडीवर अन्याय, बंडखोर उमेदवाराचा उद्धव ठाकरेंवर आरोप

  • Written By: Last Updated:

Rupesh Mhatre : भिवंडी विधानसभा (Bhiwandi Assembly) मतदारसंघात महाविकास आघाडी अडचणीत आली आहे. कारण, मविआच्या उमेदवाराविरोधात ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार रूपेश म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा समाजवादी पक्षाला मिळाली असून सपाचे विद्यमान आमदार रईस शेख यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे रूपेश म्हात्रे (Rupesh Mhatre) आणि भिवंडीतील शिवसैनिकांनी बंडाचे निशाण फडकावलं. दरम्यान, म्हात्रे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंनी समाजवादी पक्षाशी तडजोड केल्याचा आरोप रूपेश म्हात्रे यांनी केला आहे.

Vidhansabha Election : मनोज जरांगेंचं ठरलं, बीडमध्येही देणार उमेदवार, धनंजय मुडेंची पहिली प्रतिक्रिया… 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीला बंडखोरांनी मोठं आव्हान दिलंय. बंडोबांना थंड करण्यात या दोन्ही आघाड्यांच्या नाकी नऊ येत आहेत. दरम्यान, आता बंडखोर उमेदवार रूपेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. म्हात्रे म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी आमच्या पक्षात बंडखोरी होऊन पक्ष दोन गटात विभागला गेला. त्यानंतरही आम्ही भिवंडीत पक्ष एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला उभारी देऊन ताकद वाढवली. लोकसभेची जागा आम्हाला मिळावी इतकी ताकद निर्माण केली. मात्र, लोकसभेला आमच्यावर अन्याय झाला. ती जागा आम्हाला दिली गेली नाही. आता विधानसभा निवडणुकीतही आमच्यावर अन्याय होत आहे.

मुंब्र्यात जाऊन आव्हाडांना अवकात दाखवू, ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल मिटकरी संतापले… 

म्हात्रे म्हणाले, 2014 च्या निवडणुकीतही आमच्यावर अन्याय झाला. तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाला कल्याण डोंबिवलीत विजयी करण्यासाठी कपिल पाटलांचे काम भिवंडीत करावे लागले होते. तर आता आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंनी समाजवादी पक्षाशी तडजोड केली. भिवंडीतील शिवसैनिकांवर अन्याय करून उद्धव ठाकरे सपाचे उमेदवार रईस शेख यांची वरळी आणि वांद्रे पूर्वमध्ये मदत घेत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला.

म्हात्रे म्हणाले, उमेदवार रईस शेख यांची वरळी आणि वांद्रे पूर्वमध्ये घेताय. पण, आता भिवंडीतील जनतेला तुम्ही गृहीत धरू नका, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, म्हात्रे यांच्या आरोपाला आता उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांतील सुमारे ५० बंडखोर नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. महायुतीतील सर्वाधिक ३६ बंडखोर नेत्यांनी अर्ज दाखल केले असून, महाविकास आघाडीच्या १४ बंडखोरही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधील तणाव वाढणार आहे.

 

follow us