Vidhansabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा फटका बसणार असल्याचे सर्व्हे समोर आलेत. शिवाय महायुतीमध्ये (Mahayuti) अंतर्गत कलह दिसून येते आहे. शिंदे गटाकडून आणि भाजप (BJP) नेत्यांकडून सातत्याने अजित पवारांवर (Ajit Pawar)टीका होतेय. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणुका लढा, असा सल्ला भाजप नेत्यांना दिला.
दोन समाजात भांडणे लावण्याचा उचलेला विडा खाली ठेवा, अन् जनतेला…; रोहित पवारांचा भुजबळांवर पलटवार
नुकताच अमित शाहांनी मुंबईचा दौरा केला. यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या. तर आज जेपी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नड्डा यांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला. शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणुका लढा. शासकीय योजनाचं श्रेय घेत असताना ते महायुती म्हणून एकत्र घ्या, त्यासाठी आपसात मतभेद नको. भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्यावं, अशा सूचना त्यांनी दिल्या.
धनगर बांधवांनो, आत्महत्या करू नका, सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेऊ, जरांगेंचा इशारा
तसेच बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासत घ्या, असंही नड्डा यांनी सांगितलं. यावेळी नड्डा यांनी महायुतीचे आणखी उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनिती आखण्यासाठीचा भाजप नेत्यांना कानमंत्रही दिला.
दरम्यान, या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे आदी नेते उपस्थित होते.