विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवणार? हायव्होल्टेज बैठकीत दादांनी आकडाच सांगितला

विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवणार? हायव्होल्टेज बैठकीत दादांनी आकडाच सांगितला

Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठी पिछेहाट झाल्यानंतर आता महायुतीकडून सावध पावले टाकली जात आहेत. भाजप, शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जागावाटपाच्या चर्चा अजून सुरू झालेल्या नाहीत. मात्र त्याआधीच महायुतीत दबावाचं राजकारणही सुरू झालं आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या आमदारांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. या निवडणुकीत किती जागा मिळाल्या पाहिजेत याचाही अंदाज घेण्यात आला.

आपण महायुतीत एकत्रित निवडणूक लढणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 85 जागा मिळाल्या पाहिजेत या मागणीवर आपण ठाम आहोत, असे अजित पवार यांनी या बैठकीत आमदारांना सांगितले. विशेष म्हणजे या बैठकीला माजी मंत्री नवाब मलिक देखील हजर होते. या बैठकीतील त्यांच्या उपस्थितीने राष्ट्रवादीला जो मेसेज द्यायचा आहे तो दिला गेला आहे. मात्र, यामुळे भाजपाची चांगलीच अडचण झाली आहे.

Nawab Malik : महायुतीमध्ये पुन्हा वाद? नवाब मालिकांची अजित पवार गटाच्या बैठकीला हजेरी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज