Download App

विजय रूपाणी अन् निर्मला सीतारामन निवडणार महाराष्ट्राचा नवा CM

भाजपकडून विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करण्यासाठी निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची नियुक्ती केली.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला. मात्र अद्याप भाजपकडून गटनेत्याची निवड करण्यात आली नाही. दरम्यान, आता भाजपकडून (BJP) विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करण्यासाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांची नियुक्ती करण्यात आली.

बॅरिकेड्स तोडले, ट्रकवर चढले; दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन, ‘या’ आहेत प्रमुख मागण्या… 

भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडीसाठी 4 डिसेंबरला मुंबईत बैठक होणार आहे. यासाठी भाजपने निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून निवड केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी या निवडीचे पत्र जारी केले. उद्या सायंकाळपर्यंत पक्षाचे निरीक्षक मुंबईत पोहोचणार असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर 4 तारखेला भाजप आमदारांची बैठक होऊन विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल.  ही विधीमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर महायुतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे.

सेक्स वर्कर्सनाही मिळणार प्रसूती रजा, पेन्शन अन् आरोग्य विमा, जाणून घ्या नवीन कायदा 

गटनेतेपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार, याबाबत उत्सुकता आहे. फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. गटनेत्याची निवड निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे दोन निरीक्षण करणार आहेत. निवडून आलेल्या आमदारांमधून पक्षनेता आणि गटनेत्याचं नाव सूचवलं जाईल. हे नाव दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे हे निरीक्षक पोहोचवतील आणि त्यानंतर त्यानंतर पक्षनेत्याचे नाव जाहीर केलं जाईल.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळं राज्यात लवकरच महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

5 तारखेला शपथविधी…
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीने 235 जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) 57 तर राष्ट्रवादीने (अजित पवार) 41 जागा जिंकल्या. निकाल येऊन आठवडा उलटला असून महायुतीत कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे अद्याप ठरलं नाही. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख निश्चित झाल्याची माहिती दिली. महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. 5 डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदानवर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार असल्याच बावनकुळे म्हणाले.

follow us