Download App

मला धमकावणाऱ्या अजितदादांना आता माझा आवाका समजेल; शिंदेंनी समजावूनही शिवतारे ठाम

  • Written By: Last Updated:

Vijay Shivatare : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे ( Vijay Shivatare ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यातील वाद सुर्वश्रृत आहे. आता लोकसभेच्या निमित्ताने हा वाद पुन्हा उफाळून येतो आहे. बारामतीत महायुतीकडून सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर बारामतीत आपण लढणार आणि बदला घेणार असल्याचं शिवतारेंनी स्पष्ट केलं होतं. आज पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांवर टीका केली. माझी लायकी काय आणि आवाका किती हे अजित पवारांना (Ajit Pawar) दाखवणारच असा आक्रमक पवित्र शिवतारेंनी घेतला.

Viral: प्रेरणा अरोरा आणि दिव्या खोसला यांच्यातील फोन कॉल झाला व्हायरल 

आज माध्यमांशी बोलतांना शिवतारे म्हणाले की, लोकांच्या मनात अजित पवारांविषयी प्रचंड रोष आहे. पुरंदरसाठी त्यांनी काही केलं नाही. राज्यातल्या सगळ्या बॅंका, कारखाने यांच्या ताब्यात आहेत. ही अप्रवृत्ती संपवली पाहिजे. समोर कोणीही असो, आम्ही आवाज उठवणार आहोत. कोण तो विजय शिवतारे? कोण आहे तो, त्याची लायकी काय? असं विचारणारे अजित पवार आता का घाबरले? आता एवढा तडफडतोय कशासाठी असे म्हणत शिवतारेंनी थेट अरे तुरेची भाषा वापरली आहे. माझी लायकी काय आणि आवाका किती आहे, हे अजित पवारांना दाखवणाच आहे, असा इशारा त्यांनी दिला.

शिवतारे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली आहे, त्यांना मला युती धर्म पाळण्याचे संकेत दिलेत. पण ही अराजकता संपवली पाहिजे, ही जनतेची इच्छा आहे. मी नसलो तरी अजित पवार निवडणून येणार नाही, असा दावाही शिवतारे यांनी केला.तसेच शिवतारे यांनी अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते यावेळी म्हणाले आहेत की, मी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेसोबत चर्चा करून निर्णय घेईल. असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. मात्र आपण माघार घेतली असल्याची चुकीची बातमी पसरवली जात असल्याचं देखील शिवतारे यांनी नमुद केलं आहे.
 

 

follow us