Vijay Wadettiwar On Dhananjay Munde : राज्य सरकार सुस्त आणि मंत्री मस्त अशी अवस्था राज्यात झाली आहे. मंत्र्यांचं लक्ष शेतकऱ्यांकडे नाही.संपूर्ण मराठवाडा हा दुष्काळाच्या गडद छायेत आहे. सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राज्यात 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यात 186 बीड जिल्ह्यातील शेतकरी आहेत आणि मंत्री उत्तरदायी सभा करत आहात. शेतकऱ्यांचे जीव घेण्यासाठी कृषिमंत्रिपद दिले का? असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना उपस्थित केला.
मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो; आव्हाडांचं मुंडेंना प्रत्युत्तर
विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. राज्यात शासन अस्तित्वात आहे का? महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं आहे. स्वतःच्या तिजोरी भरण्याचं आणि सरकारी तिजोरी लुटण्याचं काम सुरु आहे.
Maharashtra News : फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या अंगलट; सर्वेक्षणातून ‘जोर का झटका’
नुकताच सात लोकांचा ठाण्यात लिफ्ट कोसळून जीव गेला. मजल्यावर मजले चढवत असताना कामगारांची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिल्ह्यात त्या बिल्डवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता, पण तसं झालं नाही.
राज्यात डेंग्युने थैमान घातलं आहे. राज्य सरकारचे नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष नाही. शेतकऱ्यांकडे लक्ष नाही राज्यात नौटंकी सुरु आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचं पक्षाचं सरकार आहे.
तुम्ही कोणी आंदोलन करता तेव्हा सरकार जागं होतं का? असा सवालही यावेळी विरोधी पक्षनेते वेडेट्टीवार यांनी उपस्थित केला. 100 दिवसात आरक्षण देऊ म्हणून घोषणा केली होती, तर आता अधिकार तुम्हाला आहे, तो पार पाडावा आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. हे करताना इतर कोणता समाज दुखावला जाणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. ही अंत्यत गंभीर अशी बाब आहे.
या सरकारने लोकांसाठी काही केलं नाही. तरुणांना बरबाद करायचं काम केलं. नऊ वर्षात काही केलं नाही. जे जे आश्वासन दिले होते ते पूर्ण नाही केले. उद्धव ठाकरे यांच्या आधी पण मी हे बोललो आहे. मतदान मागायला ह्यांच्याकडे काहीही नाही. उद्धव ठाकरे जे बोलतात त्यात तथ्य आहे, असेही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.