Maharashtra News : फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या अंगलट; सर्वेक्षणातून ‘जोर का झटका’
मुंबई : फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत बसलेल्या भाजपला (BJP Maharashtra) हे राजकारण चांगलेच अंगलट आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणातून (BJP Survey) हा जोर का झटका बसला असून, सध्याच्या परिस्थितीत भाजप विद्यमान आमदार आणि खासदारांच्या भरवश्यावर 60 टक्के जागा जिंकू शकतो. मात्र, यात 40 टक्के जागा धोक्यात असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. (Maharashtra 40 % BJP Sets In Risk Say Survey )
तयारीचे आदेश आले! विधानसभेसाठी पुण्यातून पवारांचा हुकमी एक्का मैदानात उतरणार
अजित पवार सत्तेत आल्यानंतर भाजपकडून काही राजकीय सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपन्यांकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघात सर्व्हेक्षण करण्यावर भर दिला आहे. यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे विद्यामान आमदार आणि खासदारांची धाकधूक वाढली आहे.
सर्व्हेक्षणात मोदींनी पसंती पण…
भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणात प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, आमदार आणि खासदारांचे कार्य, पंतप्रधान मोदींबाबतचे मत आदी गोष्टींवर सखोल सर्व्हेक्षण करण्यात आले. यात 50 टक्के मतदारांनी पंतप्रधान मोदींना पसंती दिली मात्र, मतदार संघातील उमेदवार बदलण्याची मागणी मतदारांनी केली आहे.
इंडिया आघाडी विरूद्ध आजी-माजी पंतप्रधान एकत्र, लोकसभा निडणुकांसाठी जेडीएस-भाजप युतीची घोषणा
फडणवीस- बावनकुळेंकडून नोंद
दरम्यान, राज्यातील विविध लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघात करण्यात आलेल्या या सर्व्हेक्षणाचा अहवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना सोपवण्यात आला असून, या सर्व बाबींची नोंद त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
आमदार खासदारांबाबत अनेक तक्रारी
भाजपक़डून करण्यात आलेल्या या सर्व्हेक्षणात मतदारांनी आमदार आणि खासदारांबाबत अनेक तक्रारीदेखील नोंदवल्याचे सांगितले जात आहे. लोकप्रतिविधींनी कोरोनाकाळात आणि त्यानंतरही गरज असलेल्या ठिकाणी मदत केलेली नसल्याचे मत नोंदवले आहे. याशिवाय काहींनी उर्मटपणे वागणूक दिल्याचे काहींनी म्हटले आहे. तर काहींनी भ्रष्टाचार केल्याचे नोंदवले आहे.
मराठवाड्यात आठ महिन्यात 685 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; बीड जिल्हा अग्रस्थानी
आमदार खासदारांची धाकधूक वाढली
अंतर्गत अहवाल राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्याकडे सूपुर्द करण्यात आला आहे. त्याचा आढावादेखील या तिघांकडून घेण्या आला असून, प्रत्येक खासदार आणि आमदाराला त्याच्या कामगिरीनुसार श्रेणी देण्यात आली असून, यामुळे विद्यमान खासदार आणि आमदारांची धाकधूक वाढली आहे.
Video : मराठा आरक्षण आंदोलनाचे चेहरे