Video : मराठा आरक्षण आंदोलनाचे चेहरे

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठलाय. मात्र मराठा आरक्षण हा काही आजचा प्रश्न नाही तर याला 40 वर्षांचा इतिहास आहे.
या आरक्षणासाठी ५८ मुक मोर्चे निघाले, अनेकांनी यासाठी लढे दिले, त्यानंतर मराठ्यांना २०१८ मध्ये आरक्षण मिळालं… मात्र ते सुप्रीम कोर्टात वैध ठरलं नाही.
त्यामुळे आता मराठा समाज हा पेटून उठाला आहे. मराठा आरक्षणाचा इतिहास आणि या आंदोलनाचं नेतृत्व करणारे प्रमुख चेहरे कोणकोण आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेवूयात.

१. अण्णासाहेब पाटील – मराठा आरक्षणाची पहिली मागणी ही १९८१ साली माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांनी केली. या मागणीसाठी त्यांनी २२ मार्च १९८२ साली मुंबईत मोर्चा काढला.

२. पुरूषोत्तम खेडेकर – १९९५ ला जेव्हा छावा संघटनेची स्थापना झाली तेव्हा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली होती.

३. संभाजी राजे – २०१६ ला छत्रपती संभाजी नगरमध्ये मराठा आंदोलनाची ठिणगी पडली तेव्हा पासून संभाजीराजे छत्रपती यांच नाव राजकीय पटलावर उमटू लागले. मात्र या आधी पासूनचं संभाजीराजे यात सक्रिय होते.

४. विनायक मेटे – मराठा आरक्षणाचा मराठवाड्यातील प्रमुख चेहरा म्हणजे दिवंगत नेते विनायक मेटे. मराठा आरक्षणानेच आपल्या सामाजिक आयुष्याची सुरूवात करणाऱ्या मेटेंनी पक्ष कुठलाही असला तरी मराठा आरक्षणाची आपली भूमिका कायम ठेवली.

५. प्रविण गायकवाड – मराठा आरक्षण लढ्यातील अजून एक महत्वाचं नाव म्हणजे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड. गायकवाड हे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत.

६. राजेंद्र कोंढरे – मराठा आरक्षण आंदोलनातील अजून एक महत्त्वाचे नाव म्हणजे राजेंद्र कोंढरे. हे 1986 पासून मराठा युवक संघात कार्यरत आहेत. 2008 मध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यास असलेल्या बंदी विरुद्ध त्यांनी यशस्वी लढा दिलाय.

७. आबा पाटील– ९ ऑगस्ट २०१६ पासून जेव्हा संभाजी नगर मध्ये मराठा आरक्षण मोर्चाची सुरूवात झाली तेव्हा नागपुर, मुंबईसह एकुण ५८ मोर्चे राज्यभर निघाले. शासनाने याची दखल घेत आयोगाची स्थापना केली मात्र या बाबत कोणताही तोडगा कोढला नाही.

८. विनोद पाटील – मराठवाड्यातील मराठा समाज हा ओबीसी असून निजाम काळातील आहे. तश्या नोंदी सुद्धा आमच्याकडे आहेत. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी अर्थात ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी लावून धरली होती.

९. मनोज जरांगे – सध्या जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube