मराठवाड्यात आठ महिन्यात 685 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; बीड जिल्हा अग्रस्थानी
Farmer suicide In Marathwada : राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, यातच मराठवाड्यातून शेतकरी आत्महत्यांचा उच्चांकी आकडा समोर आला आहे. आठ महिन्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, सर्वाधिक आत्महत्याक कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात होत आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात आट महिन्यात 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुर्देवाची बाब म्हणजे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
गेल्या आठ महिन्यात छ. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 95, जालना 50, परभणी 58, हिंगोलीमध्ये 22 शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे. तर, सर्वाधिक आत्महत्या या राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात झाल्या असून, तब्बल 186 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याशिवाय लातूरमध्ये 51, नांदेडमध्ये 110 धाराशीवममध्ये 113 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
इंडिया आघाडी विरूद्ध आजी-माजी पंतप्रधान एकत्र, लोकसभा निडणुकांसाठी जेडीएस-भाजप युतीची घोषणा
औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या
पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागांसह मराठवाड्यात भीषण परिस्थीती निर्माण झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून गेल्या आठ महिन्यात मराठवाड्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीने येथील भीषणता किती भयानक असेल याची कल्पना येते. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात दोघांनी विष प्राशन करून तर, एका शेतकऱ्याने गळफास घेत जीवन संपवले.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये कन्नड तालुक्यातील हतनूर येथील दिनकर बिसनराव बिडवे (वय 48 वर्षे), फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील कारभारी माणिकराव पाटोळे (वय 55 वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील जरूळ येथील अरविंद साहेबराव मतसागर ( वय 43 वर्षे) या शेतकऱ्यांचा समावेश आहे.