Maratha Reservation : लाठीमारातील आंदोलकांची प्रकृती गंभीर; मुख्यमंत्री शिंदे करणार स्व खर्चातून उपचार

Maratha Reservation :  लाठीमारातील आंदोलकांची प्रकृती गंभीर; मुख्यमंत्री शिंदे करणार स्व खर्चातून उपचार

Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्यात अनेक आंदोलक गंभार जखमी झाले होते. त्यातील दोन आंदोलकांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे त्यांना मुंबईत हालवण्यात आलं आहे.

Novak Djokovic ठरला युएस ओपन चॅंम्पियनचा बादशाह; 24 व्या ग्रॅंडस्लॅमवर कोरलं नाव

मुख्यमंत्री शिंदे करणार स्व खर्चातून उपचार…

या आंदोलकांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलकांना तात्काश मुंबईतील लीलावती रूग्णालयात हलवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता या आंदोलकांवर मुंबईत उपचार सुरू आहेत. तर मुख्यमंत्री शिंदे स्व खर्चातून या आंदोलकांवर उपचार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Sharad Pawar : जे सोडून गेले त्यांच्यासाठी परतीचे दारं बंद; अजितदादांच्या येण्याबाबत पवारांचं मोठं वक्तव्य

दरम्यान जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्जनंतर मराठा आरक्षणाचा (Reservation) मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकारने मराठा समाजाला काही अटी शर्तींनुसार कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले. मात्र, या निर्णयाने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा नवा वाद उभा राहतो की काय, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसींनीही आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. मतपेटीतून राग व्यक्त करण्याचेही सूर ऐकू येऊ लागले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube