Download App

‘…तर ओबीसी समाजाला विष देऊन मारुन टाका’; वडेट्टीवारांचा CM शिंदेंवर प्रहार

Image Credit: letsupp

Vijay Wadettivar On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाचा नेता म्हणून निर्णय घेतला असेल तर ओबीसी समाजाला विष देऊन मारुन टाका, या शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला आहे. दरम्यान, मुंबईत आज ओबीसी नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशावरुन संताप व्यक्त केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाचा नेता म्हणून निर्णय घेतला असेल तर ओबीसी समाजाला विष देऊन मारुन टाका. ओबीसी समाजातील प्रत्येकाच्या हातात विषाचा प्याला द्या आणि तुम्ही मराठ्यांचा नेता व्हा , ओबीसींना संपवून टाका, ओबीसींनी त्यांच्या अधिकारांपासून दूर ठेवा वंचित ठेवा, या शब्दांत विजय वडेट्टीवारांनी संताप व्यक्त केला आहे.

Crack: विद्युत जामवाल अन् एमसी स्क्वेअरच्या सिनेमामुळे बॉलीवूडमध्ये पहिलं गाण रिलीज

तसेच आमच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला हिंमत द्या, येत्या 20 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला असून या ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केलं आहे.

मंत्रिमंडळातील ओबीसी चेहरे शेपूट…
राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक ओबीसी चेहरे आहेत. जे आहेत तर ते अनेक जण शेपूट घालून सत्तेची खुर्ची उगवत आहेत, त्यांना सत्ता महत्वाची ओबीसी आणि समाजबांधवांचं हित महत्वाचं वाटत नाही म्हणून त्यांनी शेपूट घातलं, असल्याची जळजळीत टीका विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी ओबीसी नेत्यांवर केली आहे.

IND vs ENG : बीसीसीआयने वजनावरून हिणवलेला सर्फराज अखेर टीम इंडियात ! संघात दोन मोठे बदलही

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या 20 फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे आयोजन केले आहे. ही सभा ओबीसींच्या संविधानिक हक्काच्या रक्षणासाठी असून आरक्षण देण्यावरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. या लढाईमुळे ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करण्याचे पाप सरकारकडून केले जात असल्याचा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

गृहमंत्री म्हणतात भाजप आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री राणे म्हणतात स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. गृहमंत्री म्हणतात सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत. यावरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमधील विसंवाद दिसून येतो. हे सरकारच ओबीसी विरूद्ध मराठा हा वाद निर्माण करून दोन्ही समाजामध्ये संशयाचे वातावरण निर्माण करत असल्याचंही ते म्हणाले आहेत

follow us

वेब स्टोरीज