Download App

नांदेड दुर्घटना! ‘डीनला तत्काळ निलंबित करा’; विजय वडेट्टीवारांनी काढले वाभाडे

Vijay Wadettivar : नांदेडमध्ये 24 तासांत 24 मृत्यू प्रकरणी रुग्णालयाच्या डीनला तत्काळ निलंबित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार दरबारी केली आहे. नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. यामध्ये आणखीन 7 मृतांची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट आलं आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता विजय वडेट्टीवारांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत.

पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीत खदखद वाढली : अजितदादा गटातील सर्व मंत्री फडणवीसांच्या भेटीला

विजय वडेट्टीवार म्हणाले, हा नालायक सरकारचा नाकर्तेपणा असून केवळ बदल्या आणि टेंडरमध्ये २० टक्के वसूली सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. यावेळी त्यांनी डीनला तात्काळ निलंबित करा, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नागरिकांचा बळी गेला आहे, यामध्ये नवजात बालकांचा समावेश आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे हे सगळं घडत आहे. सरकारनेच या सगळ्यांचा बळी घेतला आहे. याला रूग्णालय न म्हणता स्मशानभूमी म्हणावं का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

Chhattisgarh Election : केजरीवालांनी गिरवला भाजपचा कित्ता; उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

ठाण्यातील घटनेच्या चौकशीची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र, अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. प्रसूतीच्या काळात गरीबांच्या मुलांचा मृत्यू होत आहे. वर्षभरात ४५० जणांचा मृत्यू झाला आहे. येथे पूर्ण वेळ डीन नाही. अद्याप डॉक्टरची व्हिजिट नाही. साप चावल्यानंतरच्या उपचाराची औषधे नाहीत. लहान बालकांची औषधे नाही, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं.

Dhananjay Munde : संजय राऊत करमणुकीचं साधन, आम्हाला कंटाळा आलाय; मंत्री मुंडेंचा टोला

दरम्यान, आपण आरोग्य मंत्र्यांच्या कामाचा पंचनामा करणार आहोत. हसन मुश्रीफ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. हा नालायक सरकारचा नाकर्तेपणा असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच फक्त बदल्या आणि टेंडरमध्ये २० टक्के वसूली सुरू असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

शिंदेंच्या खासदाराने डीनकडून शौचालय साफ करुन घेतलं :
मृत्यूच्या घटनेनंतर विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी तत्काळ रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तर विरोधकांकडून या घटनेवरुन सरकारचं रुग्णालयाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोपही करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासादार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात घाणीचं साम्राज्य होतं. अनेक शौचालय ब्लॉक असल्याचं समोर आलं होतं. काही शौचालयात सामानही ठेवल्याचं समोर आलं होतं. रुग्णालयाची अशी अवस्था पाहुन हेमंत पाटलांनी डीनला स्वत; शौचालय साफ करायला लावलं आहे.

Tags

follow us