Chhattisgarh Election : केजरीवालांनी गिरवला भाजपचा कित्ता; उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Chhattisgarh Election : केजरीवालांनी गिरवला भाजपचा कित्ता; उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Chhattisgarh Election 2023: मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) भाजपने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उमेदवरांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत.यामध्ये तीन केंद्रीय मंत्री आणि सात खासदारांचा देखील समावेश आहे. हाच कित्ता आपचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी छत्तीसगडमध्ये गिरवला आहे. बारा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी (Chhattisgarh Election 2023) आम आदमी पार्टीने (APP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 12 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. पहिल्या यादीत पक्षाने 10 उमेदवारांना तिकीट दिले होते. अशाप्रकारे आम आदमी पक्षाने 90 विधानसभेच्या जागा असलेल्या छत्तीसगडसाठी आतापर्यंत 22 उमेदवार उभे केले आहेत.

Asian Games 2023: भारताच्या खात्यात आणखी 7 पदके, हॉकी संघ उपांत्य फेरीत, असा होता दिवस

कोणकोण उमेदवार उभे करण्यात आले?
प्रतापपूर- राजा राम श्याम
सारंगढ- देव प्रसाद कोशळे
खरसिया-विजय जयस्वाल
कोटा-पंकज जेम्स
बिल्हा-जसबीर सिंग
बिलासपूर- डॉ.उज्ज्वला कराडे
मस्तुरी- धरमदास भार्गव
रायपूर ग्रामीण-तरुण वैद्य
रायपूर पश्चिम- नंदन सिंग
अंतागड-संतराम सलाम
केशकाल- जुगल किशोर बोध
चित्रकोट- बोमाडा राम मांडवी

राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरात घेतले दर्शन, सेवाही केली; पाहा फोटो

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube