Download App

आता मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना येणार का?, चढ्ढाला 400 कोटी दिल्याने वडेट्टीवार संतप्त

मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का?, असा खोचक सवाल वडेट्टीवार यांनी केला.

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar : राज्यात आतापर्यंत एकही गृहनिर्माण प्रकल्प न राबविलेल्या खासगी विकासकाला सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली बिनव्याजी 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम महाराष्ट्र निवारा निधीतून देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मान्यता दिली आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकावर जोरदार टीकी केली.

एकसारखेच 3 हजार मतदान कार्ड! निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करणार; बावनकुळेंचा इशारा 

 

विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट करत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी लिहिलं की, लाडका कंत्राटदारनंतर आता, मुख्यमंत्र्यांची लाडका बिल्डर योजना सुरू केलीये. अनुभव नसलेल्या चड्डा बिल्डरच्या घशात घातले 400 कोटी रुपये महायुती सरकारने घातले. सरकारजवळ बिल्डरसाठी पैसे आहेत, पण बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी पैसे नाहीत, असं वडेट्टीवार म्हणाले.

CM योगींना मोठा धक्का… कावड यात्रेतील ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला स्थगिती.. कोर्टात काय घडलं? 

पुढं त्यांनी लिहिलं की, गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर  मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का?, असा खोचक सवाल वडेट्टीवार यांनी केला.

हा तिजोरीवर जाता-जाता घातलेला दरोडा
सरकारची तिजोरी खासगी बिल्डरसाठी महायुती सरकारने खुली ठेवली आहे. हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर जाता-जाता घातलेला दरोडा आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा निर्णय मान्य आहे का हा देखील प्रश्न आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

पुढं त्यांनी लिहिलं की, मे. चढ्ढा डेव्हलपर्स आणि प्रमोटर या दिल्लीस्थित कंपनीवर ही मेहेरनजर दाखविण्यात आली आहे. २०२१ मध्ये या विकासकाशी म्हाडाने करार केला. मात्र आतापर्यंत एकाही घराचा ताबा लाभार्थीना दिलेला नाही. असं असतांना त्याला चारशे कोटींची कोटींची खिरापत का दिली जातेय. गृहनिर्माण विभागाने असा निधी देण्यास विरोध दर्शविला. त्यानंतरही हा निधी देण्यासाठी कोण दबाव आणतंय याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले, सीबीआयने कारवाई केल्यानंतर तुरूंगात गेलेला डिंपल चड्डा हा बांधकाम व्यावसायिक राज्य सरकारचे पैसे घेऊन जर परदेशात पळून गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा रोखठोक सवालही वडेट्टीवार यांनी केली.

follow us