एकसारखेच 3 हजार मतदान कार्ड! निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करणार; बावनकुळेंचा इशारा
Chandrashekhar Bawankule News : मालेगावसह धुळ्यात मतदानकार्डात घोळ होत असून एकसारखेच 3 हजार मतदान कार्ड असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. पुढील तीन दिवसांत निवडणूक आयोगाने सुधारणा न केल्यास भाजपकडून मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत, राज्य सरकारचा मोठा निर्णय
धुळे आणि मालेगावमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदारसंघात आढळून आली आहेत. तसेच काही लोकांची नावे वगळण्यात आलेली आहेत. त्यामुळे या लोकांना मतदानाला मुकावे लागणार आहे. अनेक मतदारांची नावे दोनदा दिसून येत आहेत. तर एकसारखेच 3 हजार मतदान कार्ड एकसारखेच असल्याचं दिसून येत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून ग्राऊंडवर उतरुन काम केलं नसून सर्वेक्षण केलेलं नाही. याआधी मतदान केंद्र 800 ते 900 असंत मात्र, 1300 ते 1500 मतदान केंद्र आहेत. यासंदर्भात आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतली आहे. या प्रकरणी जे जे अधिकारी आणि जिल्हाधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, .यासोबत पुढील तीन दिवसांत सुधारणा करावी अन्यथा भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात येणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंयं.
केदारनाथ मंदिराकडं जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील दोन यात्रेकरुंसह तिघांचा मृत्यू
राज्यातील काही भागांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका लागल्या आहेत. तर अनेक भागांत पावसाचं वातावरण आहे. पावसामुळे निवडणूक काळात अडथळे येऊ शकतात, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत निवडणूका लावण्यात योग्य नाही. त्यामुळे या निवडणूका रद्द करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी पत्राद्वारे केली असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.