Download App

‘ईडी’च्या धाकातून आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला ‘चले जाव’ म्हणा!

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ‘ईडी’ धाक दाखवून पाडले. त्यातूनच एकनाथ शिंदे यांचे राज्यात सरकार आणले. सत्तेसाठी प्रभू श्रीराम यांच्या नावाचा वापर केला. पण, स्वार्थासाठी यांनी महापुरुषांचा गैरवापर केला आहे. परंतु, भाजपला प्रभू श्रीरामच कोणताच देव पावणार नाही, असा सणसणीत टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला.

नागपूर येथे महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभा सुरु असून त्यात विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर सडकून टीका केली.

शिंदे जाणार … अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत? – Letsupp

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात महागाई, बेरोजगारी वाढत चालले आहे. पण, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी गैरलागू मुद्दे उपस्थित करून राज्यातील जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला आता ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे.

स्वतःच काही कर्तृत्व नाही. त्यामुळेच आज महापुरुषांचे नाव वापरून भाजप मतांची भीक मागत आहे. महापुरुषांचा गैरवापर करत आहे. महाराष्ट्र राज्याला पूर्ण देशात बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे. त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. स्वार्थी, सत्तेचा गैरवापर करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकार आता आपण ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका देखील विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

follow us