Vijay Vadettiwar : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत आले आहेत. यावेळी देखील पुन्हा एका वडेट्टीवार त्यांच्या अशाच एका वक्तव्यामुळे ते अडचणीत तर आले आहेतच मात्र त्याचा सत्ताधारी भाजपने देखील चांगलाच फायदा उठलवला आहे. हे वक्तव्य राहुल गांधी यांच्याबाबतच आहे. जे एका भाषणामध्ये वडेट्टीवारांनी केलं आहे. त्यावरून भाजपने वडेट्टीवारांना घेरल्याचं पाहायला मिळत आहे.
विजय वडेट्टीवार कधी सत्तांतर करणार? आशिष देशमुखांनी सांगितली डेडलाईन
काय म्हणाले वडेट्टीवार?
एका भाषणामध्ये बोलत असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चांगला वक्ता असण किती गरजेच असत हे सांगितलं. यावेळी त्यांनी थेट कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, तुम्हाला अगोदर चांगला वक्ता असणं गरजेच आहे. राहुल गांधी पात्र आहेत. मात्र वक्ता चांगले नाहीत. त्यामुळे तुम्हाला अगोदर चांगला वक्ता असणं गरजेच आहे. त्यांचा हा व्हिडीओ भाजपच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. तर वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर भाजपने चांगलाच समाचार घेतला आहे.
काय म्हटलं आहे भाजपच्या पोस्टमध्ये?
वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर टीका करताना या पोस्टमध्ये भाजपने लिहीले की, ये पप्पू लीडर नहीं बन सकता। यह पप्पू बात नहीं कर सकता। हे वक्तव्य आमचे नाही तर स्वतः काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आहे.
Assembly Elections : 5 राज्यांच्या निवडणुका मोदी सरकारला निरोप ठरणार; ठाकरे गटाचा जोरदार हल्ला
ते इतकंच म्हणून थांबले नाही तर त्यांनी मान्य देखील केलं की,आता कॉंग्रेसमध्ये कोणीच ‘आदर्श’ नेता उरला नाही. आता कोणीच वरिष्ठ नेते उरले नाहीत त्यांच्या चरणांचा स्पर्श करता येईल. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी आता राजकारणाला राम राम ठोकावा आणि तरुण पिढीतल्या उमेदवारांना संधी द्यावी. पण स्वतःला तरुण म्हणणारे वयाचे अर्ध शतक पार केलेले तुमचे नेते अजूनही बोलायचं कसं, वागायचं कसं याचे धडे घेत बसलेत.
ये पप्पू लीडर नहीं बन सकता।
यह पप्पू बात नहीं कर सकता।हे वक्तव्य आमचे नाही तर स्वतः काँग्रेस नेते विरोधीपक्षनेते @VijayWadettiwar यांचे आहे.
ते इतकंच म्हणून थांबले नाही तर त्यांनी मान्य देखिल केलं की,आता कॉंग्रेसमध्ये कोणीच ‘आदर्श’ नेता उरला नाही. आता कोणीच वरिष्ठ नेते उरले… pic.twitter.com/2tud14PJpg
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 10, 2023
जनतेला तर तुमच्या या इंटरनॅशनल पप्पूवर विश्वास नाहीच. आता या वक्तव्यामुळे तुम्ही विरोधी पक्षनेते पदावरून पायउतार झाले तर त्यात नवल वाटणार नाही कारण हीच मानसिकता काँग्रेसमध्ये पक्षीय लोकशाहीच्या नावाने ओळखली जाते. असं म्हणत वडट्टेवारांनी भाजपने चांगलच घेरल्याचं पाहायला मिळालं.