Vijay Wadettiwar: सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या होऊन वीस दिवस उलटले तरीही या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही. या हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड (Walmik Karad) असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी होतेय. मात्र, वाल्मिक कराडची अद्याप चौकशीही झाली नाही. यावरून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, तो काय सरकारचा जावई आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
Dileep Sankar : हॉटेलच्या रुममध्ये आढळला प्रसिध्द अभिनेत्याचा मृतदेह, मनोरंजन क्षेत्रात शोककळा…
मुंडेचा राजीनामा घ्या…
वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीड हत्या प्रकरणावर भाष्य केलं. सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून काल एवढा मोठा मोर्चा निघाला. मात्र त्यानंतरही सरकारला जाग आली नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळणार नाही, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
पुढं ते म्हणाले, या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक होत नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अशा मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, पण अजून अटक का झाली नाही? वाल्मिक कराड हा सरकारचा जावई आहे का? असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून झाला, त्यांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत का? मुंडे म्हणतात चौकशी करा, कुणाचे कुणाशी संबंध आहेत, हे तपासा. मग वाल्मिक कराडला शोधा आणि त्याची नार्को टेस्ट करा. म्हणजेच त्यांचा खुनाच्या गुन्ह्यात समावेश केला जाईल. वाल्मिक कराडची नार्को टेस्ट झालीच पाहिजे. बीडमध्ये आतापर्यंत झालेल्या खून, खंडणी व महिला छेडछाडीच्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.
ब्रेल लिपीचे जनक यांची 215 वी जयंती; ‘या’ तारखेला अहिल्यानगरमध्ये अंध व्यक्तीसाठी कार्यशाळेचं आयोजन
पोलिसांना लकवा का मारतो?
बिहारसारखी परिस्थिती महाराष्ट्रातील बीडमध्ये झालीये. अनेकांच्या जमिनी लुटल्या, खंडणी मागितली गेली, महिलांवर अत्याचार होतात. संतोष देशमुख यांच्या हत्येसारखे प्रकरण होऊन पोलीस वाल्मिक कराडला का अटक करू शकत नाहीत? परभणीमध्ये भीमसैनिकांवर कारवाई करतांना पोलिसांना धार येते, मग बीडमध्ये पोलिसांना लकवा का मारतो?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.