Dileep Sankar : हॉटेलच्या रुममध्ये आढळला प्रसिध्द अभिनेत्याचा मृतदेह, मनोरंजन क्षेत्रात शोककळा…

  • Written By: Published:
Dileep Sankar : हॉटेलच्या रुममध्ये आढळला प्रसिध्द अभिनेत्याचा मृतदेह, मनोरंजन क्षेत्रात शोककळा…

Dileep Sankar found dead in hotel room : मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येतेय. प्रसिद्ध मल्याळम टीव्ही अभिनेते दिलीप शंकर (Dileep Sankar) यांचे निधन झाले. आज (२९ डिसेंबरला) सकाळी तिरुअनंतपुरममधील हॉटेलच्या खोलीत त्यांचा मृतदेह सापडला. दिलीप यांच्या निधनामुळे मल्याळम मनोरंज क्षेत्रात शोककळा पसरली असून, या वृत्तानंतर त्यांचे चाहतेही अस्वस्थ झाले आहेत.

…त्यांना कडक शासन करा, अन्यथा सरकाjवर ठपका पडेल, गोगावलेंचे बीड हत्या प्रकरणावर मोठं विधान 

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, दिलीप शंकर हे त्याच्या ‘पंचगणी’ या टीव्ही शोच्या शूटिंगसाठी एका हॉटेलमध्ये थांबले होते. अभिनेत्याने 19 डिसेंबर रोजी हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. हॉटेलच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर दिलीप शंकर कधीच खोलीतून बाहेर आले नाहीत. त्यांच्या सहकलाकारांनीही त्यांना अनेकदा फोन केला. मात्र त्यांनी एकदाही फोन उचलला नाही. खोलीतून दुर्गंधी येत असल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला असता दिलीप आत बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

Game Changer Film: पाच गाण्यांच्या चित्रिकरणासाठी 75 कोटी रुपय चुराडा, राम चरणच्या ‘गेम चेंजर’ची गोष्ट 

दरम्यान, दिलीप शंकर यांचा मृत्यू कसा झाला, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, प्राथमिक माहितीनुसार त्याच्या मृत्यूमागे अद्याप कोणाचा हात असल्याचे समोर आलेले नाही.

दिलीप हे लोकप्रिय टीव्ही शो ‘अम्मैरीयाथे’ आणि ‘पंचगणी’साठी ओळखले जातात. चाहत्यांनी त्याला भरभरून प्रेम दिले आहे. हा अभिनेता शेवटचा ‘पंचगणी’ या मालिकेत चंद्रशेननच्या भूमिकेत दिसला होता. अलीकडेच ‘अम्मैरियाथे’ मधील पीटर या व्यक्तिरेखेसाठी त्याचे खूप कौतुक झाले. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने मल्याळम मनोरंजन उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.

दिलीप शंकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री सीमा जी नायर यांनी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली. अभिनेत्रीने लिहिले की, ही घटना फारच दु:खद आहे. तुम्ही मला फक्त पाच दिवसांपूर्वीच कॉल केला होता, पण तेव्हा मी तुमच्याशी नीट बोलू शकले नाही. आता अलीकडेच एका पत्रकाराने मला फोन करून याबाबत माहिती दिली. या क्षणी मला दुसरे काही लिहिता येत नाही…. देव तुमच्या आत्म्यास शांती देवो, अशा शब्दात नायर यांनी दुःख व्यक्त केलं.

दिलीप शंकर हे मूळचे एर्नाकुलमचे असून अनेक लोकप्रिय मल्याळम शोमध्ये त्यांनी काम केलेय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube