Download App

विखे पाटील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार? प्रकाश आबंडेकर यांचं मोठं विधान

  • Written By: Last Updated:

पुणे : भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचा नवीन चेहरा असू शकणार, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकरिता भाजपकडून निवडणुकीत खेळी खेळली जात आहे. तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होण्यासाठी बाळासाहेब थोरात देखील प्रयत्नशील असल्याचे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात, अशी लढत होणार आहे .

देवेंद्र फडणवीस यांना आवडणार नाही, पण भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा राधाकृष्ण विखे पाटील होऊ शकतात. त्याचबरोबर जी काही नगरमध्ये खेळी झाली आहे. यावरुन बाळासाहेब थोरात यांनी देखील काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होण्याची इच्छा झाली आहे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीच्या चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगली आहे. याबाबत दोन्ही नेत्यांच्या बैठका देखील झाल्या आहेत. यावर देखील प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत वक्तव्य केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा एकत्र होता. उद्धव ठाकरे यांनी माझ्या आजोबांचे हिंदूत्व मी घोतोय, असे जाहीर केल्यामुळे धर्म सुधारणेची चळवळ सुरु झाली. बाळासाहेबांचे मताचे राजकारण होते, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.

Tags

follow us